मंगेशकर कुटुंबियांची मागणी

Twitter: @maharashtracity

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे गेल्या वर्षी ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले, सोमवारी पहिलाच पुण्यतिथी दिन होता. दीदींच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्ताने दीदींच्या स्मारकाचे (memorial of Lata Didi) भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मंगेशकर कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी दीदींचे नाव कोस्टल रोडला देण्यात यावे, अशी मागणी मंगेशकर कुटुंबियांकडून राज्य सरकारकडे करण्यात आली.  

लतादीदींचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. दीदींच्या पहिल्या पुण्यतिथीला त्यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. स्मारकाच्या भूमिपूजनाला उपस्थित असलेल्या मंगेशकर कुटुंबियांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे. दरम्यान, लतादीदींचे स्मारक कुठं व्हावं, यावर चर्चा होत असताना हे स्मारक मुंबईतील हाजी अली चौकात उभे राहणार आहे. मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) मुंबईतील ताडदेव येथील हाजीअली चौकात हे स्मारक बांधण्यात येणार आहे. 

स्मारकाच्या भूमिपूजनाला लतादीदींच्या बहिणी उषा मंगेशकर, मीना मंगेशकर, भाचा आदिनाथ मंगेशकर यांसह मंगेशकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. तर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह शिवाजी साटम, सुदेश भोसले आणि नितीन मुकेश हे कलाकार देखील उपस्थित होते. यावेळी उषा मंगेशकर यांनी सांगितले की, लतादीदींच्या स्मारकाचे भूमिपूजन झाल्याचा आनंद सर्वांनाच आनंद आहे. मुंबईत बांधल्या जाणाऱ्या कोस्टल रोडला (coastal road) लतादीदींचं नाव देण्यात यावे, अशी विनंती राज्य सरकारकडे केली असल्याचे उषा मंगेशकर यांनी सांगितले. 

दरम्यान, लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कात (Shivaji Park) व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, काही रहिवाशांकडून याठिकाणी स्मारकाला विरोध होता. यावर लतादीदींचे बंधू आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सर्व नेत्यांना स्मारकावरून होणारे राजकारण थांबवण्याचे आवाहन केले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here