मोफत उपचारानेद्वारे मिळणार नवीन दृष्टी

पालिकेतर्फे कामगारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचा शुभारंभ

जागतिक दृष्टी दिनानिमित्त घन कचरा व्यवस्थापन खात्याचा उपक्रम

@maharaahtracity

मुंबई: मुंबईत दिवस – रात्र साफसफाई ठेवण्याचे काम पालिका घन कचरा खात्याचे हजारो कामगार करीत असतात. १३ ऑक्टोबरला ‘जागतिक दृष्टी दिन’ असून यानिमित्ताने महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या पुढाकाराने व ‘मिशन फॉर व्हिजन’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने या कामगारांचे आरोग्य सुदृढ असावे या उद्देशाने १० ते १५ ऑक्टोबर या कालावधीत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन परळ येथे केले आहे.

या शिबिराचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते सोमवारी परळ परिसरातील भातनकर महापालिका शाळेमध्ये करण्यात आला. या शिबिराचा लाभ घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना डोळ्यांना काही इजा, दुखापत असेल, काही त्रास असेल तर ते औषधोपचाराने दूर करण्यात येणार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना एक प्रकारे नवीन दृष्टी मिळणार आहे.

मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा या सुव्यवस्थित प्रकारे मिळाव्यात, यासाठी बृहन्मुंबई महापालिकेचे कामगार – कर्मचारी – अधिकारी अव्याहतपणे कार्यरत असतात. तर मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी घन कचरा व्यवस्थापन खात्यातील कामगार दिवसरात्र, अगदी नियमितपणे कार्यरत असतात. मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या आपल्या कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी पालिका प्रशासन सजगपणे घेत असते.
त्यामुळेच या कामगारांच्या आरोग्यासाठी पालिकेने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

१० ऑक्टोबरपासून ते १५ ऑक्टोबरपर्यंत परळ परिसरातील भातनकर महापालिका शाळेमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दररोज सकाळी १० ते दुपारी १.३० या कालावधी सुरू असणार राहणार आहे. विशेष म्हणजे या शिबिरातील तपासणीनंतर आवश्यक ते औषधोपचार, चष्मे इत्यादी बाबीदेखील मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, अशी माहिती घन कचरा व्यवस्थापन खात्यामार्फत देण्यात आली आहे.

महापालिका मुख्यालयात सोमवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाला उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) डॉ.संगीता हसनाळे, प्रमुख अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) भारत तोरणे, प्रमुख अभियंता (घन कचरा व्यवस्थापन – प्रकल्प) मिनेश पिंपळे, ‘मिशन फॉर व्हिजन’ या स्वयंसेवी संस्थेच्या एलिझाबेथ कुरियन, श्रीकांत अय्यंगार, केबीएचबी रुग्णालयाचे डॉ. चंद्रशेखर वअशोक गायकवाड आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here