@maharashtracity
मुंबई: दसरा मेळाव्यानिमित्ताने शिवाजी पार्क येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आणि बीकेसी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांचा मेळावा निर्विघ्नपणे पार पडला. मात्र मेळाव्याची वातवरण निर्मिती करण्यासाठी काही दिवस अगोदर लावलेले होर्डिंग (hoarding) फलक (banners) मेळावे संपून २४ तास उलटले तरी हे पालिकेने हटविले नाहीत. ते कधी हटविणार अशी कुजबुज नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
जून महिन्यात महाराष्ट्रात राजकिय भूकंप झाला होता. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी करून भाजपला (BJP) साथ देत सत्तांतर घडवून आणले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले. ठाण्याचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. दोन्ही गटांकडून शिवसेना (Shiv Sena) मूळ पक्ष, चिन्ह यांवर दावा करण्यात आला आहे. तेव्हापासून राज्यात शिंदे व ठाकरे यांच्यातील गटबाजीला उधाण आले आहे. खरी शिवसेना कोणाची याचा न्यायनिवाडा आता सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. मात्र दसरा मेळाव्यात (Dusshera rally) दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
या दसरा मेळाव्यासाठी काही दिवस अगोदरपासूनच दोन्ही गटाचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आदींनी मुंबईतील चौकाचौकात, सिग्नल, स्टेशन परिसरात व दर्शनीय ठिकाणी विशेषतः दादर, घाटकोपर, कुर्ला आदी ठिकाणी मोठमोठ्या होर्डिंग, छोटे फलक लावून वातावरण निर्मिती केली होती. आता दोन्ही गटांचे मेळावे संपले. या मेळाव्यासाठी जमलेली गर्दी घरी परतली. मात्र मेळावा संपून २४ तास उलटले तरी हे होर्डिंग, फलक पालिकेने (BMC) हटविले नाहीत. ते कधी हटविणार, अशी कुजबुज नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
वास्तविक, रस्त्यांवरील सिग्नलजवळ जाहिरात धोरणातील नियमानुसार फ्लॅक्स, होर्डिंग, फलक लावणे चुकीचे आहे. तरीही मुंबईत रस्त्यांवरील सिग्नलजवळ होर्डिंग, बॅनर्स वगैरे लावण्यात येतात. पालिका प्रशासन, संबंधित अधिकारी यांच्याकडून सर्रासपणे दुर्लक्ष करण्यात येते, अशी चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळते.