@maharashtracity

शहरात २० टक्के मधुमेहाने ग्रस्त

मधुमेहाबाबत जनजागरुकता करणार

मुंबई: कोरोना संसर्गात दगावलेले बहुतांश रुग्ण मधुमेहाने त्रस्त होते. तसेच इतर कोविडेतर आजाराने मृत्यू पावलेल्या (post covid death) रुग्णांमध्ये देखील मधुमेहाचे प्रमाण जोखमीचे होते. सध्या रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण मधुमेहाने ग्रस्त असून वार्षिक मृत्यू संख्येत सुमारे १२ टक्के रुग्णांचे मृत्यू हा मधूमेहामुळे होत असल्याचे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. (deaths due to diabetes)

तरी देखील मधुमेहाबाबत मुंबईकर (Mumbaikar) सजग झाला नाही. त्यामुळे १४ नोव्हेंबर रोजी येणाऱ्या “जागतिक मधुमेह दिना”पासून मुंबई महापालिका प्रशासन (BMC) मधुमेहाबाबत जागरुकता निर्माण करणार असल्याचे सांगण्यात आले.

त्यासाठी १ लाख मुंबईकरांची मधुमेह तपासणी करण्यात येणार आहे. सध्या सुरु असलेल्या कोरोना काळात गंभीर स्थितीपर्यंत जाणारे तसेच आयसीयू सारख्या उपकरणांची गरज लागणाऱ्या रुग्णांना मधुमेहाने त्रासले असल्याचे कोरोना उपचार निरीक्षणातून समोर येत आहे.

Also Read: राणी बागेत नऊ दिवसांत ५१ हजार पर्यटक ; २१ लाखांचे उत्पन्न

शिवाय मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये मधुमेहाचे लक्षणीय प्रमाण असल्याचे समोर आले आहे. मुंबईत रुग्णांमध्ये मधुमेहाचे गंभीर प्रमाण सुरु असून देखील नेमक्या मधुमेही रुग्णांची आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे मुंबईकर मधुमेहींचे प्रमाण सांगता येणार नसल्याचे पालिकेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले.

याला कारण म्हणजे मधुमेहाची तपासणी करण्यास पालिकेच्या दवाखान्यात कमी प्रमाणात रुग्ण येत असल्याने रुग्णांची पूर्ण नोंद नाही. शिवाय मधुमेह तपासणारी यंत्र उपलब्ध असल्याने रुग्ण घरच्या घरी मधुमेहाची तपासणी करतात.

आता मात्र पालिकेचा आरोग्य विभाग सावध झाले असून दिनांक १२ नोव्हेंबरपासून मधुमेह जागृती अभियान सुरू करणार आहे. यात दोन आठवड्यात १ लाख मुंबईकरांची मधूमेहाची चाचणी करण्यात येणार आहे.

तसेच जनजागृतीसाठी विशेष पथक नेमण्यात आले असून आजाराची लक्षणे, परिणाम चाचणी व उपचार अशी माहिती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here