Twitter: @maharashtracity
मुंबई: कलाकार अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. तुनिषा शर्मा अलिबाबाः दास्तान ए काबुल या टिव्ही मालिकेत मुख्य भूमिका करत होती. वसई पुर्वेकडील कामण येथील भजनलाल स्टुडियोत या मालिकेचे चित्रीकरण सुरू होते.
शनिवारी दुपारी तुनिषाने मेकअप रूपमध्ये जाऊन गळफास घेतला. सायंकाळी ५ वाजता ही बाब ध्यानात आल्यावर सहकाऱ्यांनी तिला स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर रात्री उशिरा तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात आणण्यात आला. जे जे रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन पार पडल्याचे जे जे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यावर जे जे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी सांगितले की, उत्तर रात्री १.३० वाजता पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात आणला. त्याच वेळी शवविच्छेदन प्रक्रियेला सुरुवात करुन पहाटे ४.३० वाजता शवविच्छेदन पूर्ण करण्यात आले असल्याचे डॉ. सुरासे म्हणाले.
दरम्यान, या कलाकाराच्या आत्महत्येबाबत चर्चा केली जात आहे. तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन तिचा कथित प्रियकर शिझान खान याला शनिवारी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.