X : @maharashtracity

मुंबई: मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये अणुऊर्जा विभागाकडून कर्करुग्णांवर प्रोटॉन बीम थेरेपी करण्यात येते. कमी दुष्परिणामामुळे ही थोड्याच कालावधीत प्रचलित झाली आहे. प्रोटॉन थेरेपी ही प्रगत तंत्रज्ञान असून ऑगस्ट २०२३ पासून टाटाच्या अक्ट्रेक सेंटर मध्ये ११९ रुग्णांनी प्रोटॉन थेरपीचा उपचार घेतला असल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करून हे सेंटर राष्ट्राला समर्पित करण्यात आले आहे. टाटामध्ये दरवर्षी ७५ हजार नवीन कर्करोग रुग्णांची नोंदणी होत असते.

टाटा मेमोरियल सेंटर हे संशोधन आणि शिक्षणासाठी प्रगत उपचार तंत्रज्ञानाने सुसज्ज असे आहे. खारघर येथील केंद्रात प्रोटॉन पद्धतीने उपचार करण्यात येत असतात. जागतिक आकडेवारी नुसार रेडिएशन थेरपी दिलेल्या १५-२० टक्के रुग्णांना प्रोटॉन बीम वापरुन उपचारांचा फायदा होऊ शकतो. भारतात दरवर्षी ६ हजार मुलांना कर्करोगाचे निदान होत असून यातील ४००० हजार लोकांना प्रोटॉनबीमचा फायदा होऊ शकतो. तर प्रौढ रुग्णांना देखील प्रोटॉन बीम पद्धतीचा फायदा होऊ शकतो असे सांगण्यात आले. 

युनायटेड स्टेट्समध्ये या प्रोटॉन थेरपीवर सुमारे एम ते दीड कोटी खर्च होते. दरम्यान अक्ट्रेक सेंटरमध्ये वर्षभरात ११९ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून ६२ टक्के रुग्ण सामान्य वर्गातील तर ३८ टक्के खासगी रुग्ण होते. २८ रुग्णांवर म्हणजेच २४ टक्के रुग्णांवर पूर्ण मोफत उपचार करण्यात आले. २२ रुग्ण बालरुग्ण होते. बहुतांश रुग्णांमध्ये हाडांच्या गाठी झालेले ३२ टक्के रुग्ण तर सीएनएस ट्युमर रुग्णांमध्ये २९ टक्के रुग्ण होते असल्याचे सांगण्यात आले.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here