@maharashtracity

किमान तापमान २० अंश सेल्सिअसवर

मुंबई: काल परवा पर्यंत ढगाळ वातावरणामुळे मुंबईसह राज्याला घाम फोडणारे वातावरणाने काल सोमवारी अचानक बदल घेतली. शुक्रवारी मुंबई उपनगरातील किमान तापमान २० अंश सेल्सियस वर आल्याने गारवा पसरला होता.

किमान तापमान २० अंश सेल्सिअसहून खाली गेल्यावर थंडी सुरु झाली असे म्हटले जाते. दरम्यान शहरातील तापमान २२.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले होते. मुंबईतील थंडीच्या मोसमातील ही पहिलीच निचांकी नोंद असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रविवारी सायंकाळच्या दरम्यान सुरु झालेल्या मतलई वाऱ्यातून थंडीची चाहूल मुंबईला (Mumbai) लागण्यास सुरुवात झाली. सोमवारी पहाटे मात्र याचा अनुभव आला. रात्रीचे तापमानच घटून सांताक्रूझ वेधशाळेने किमान तापमानाची २०.० अंश सेल्सियस तर कुलाबा वेधशाळेने २२.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली.

म्हणजेच रविवारी सायंकाळ पासून किमान तापमान २ अंश सेल्सिअस एवढी घट झाली असल्याचे हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. दरम्यान मुंबईतील कमाल तापमान सांताक्रूझ येथे ३२.८ तर कुलाबा येथे ३४.० अंश सेल्सियस नोंदविण्यात आले.

मुंबईत आगामी चार दिवस ढगाळ वातावरण राहणार असून वातावरण आजच्या प्रमाणेच राहिल. तर राज्यातील अनेक भागात पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज असून वातावरणात गारवा राहण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here