@maharashtracity

डोंबिवली: ज्येष्ठ पत्रकार व दैनिक सामनाचे पहिले वृत्त संपादक नंदकुमार टेणी यांचे मूत्रपिंडाच्या दीर्घ आजाराने आज निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. टेणी यांच्या निधनामुळे अभ्यासू पत्रकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाबद्दल पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे.

दैनिक सामनाच्या पहिल्या अंकापासून नंदकुमार टेणी हे कार्यरत होते. विविध क्षेत्राची सखोल जाण, बातमीतील नेमकेपणा आणि अभ्यासू वृत्ती यामुळे ते पत्रकारांमध्ये लोकप्रिय होते. दैनिक सामनामध्ये त्यांनी सदरही चालवले. राजकारणासह साहित्य, कला, चित्रपट अशा विषयांवरही त्यांनी लेखन केले. सामनामधील कारकिर्दीनंतर त्यांनी लोकमत, नवशक्ती, देशदूत अशा दैनिकांमध्ये विविध पदांवर काम केले.

शिवसेना नेते मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणारे ‘नांदवी ते वर्षा’ हे पुस्तक टेणी यांनी लिहिले होते. ते अतिशय गाजले.

नंदकुमार टेणी हे गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत राहात होते. मूत्रपिंडाने आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. अखेर आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी असून शनिवारी डोंबिवलीतील शिवमंदिर येथील वैवुंâठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here