Twitter : @maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या अग्निशामन दलातर्फे अग्निशामक पदाच्या भरतीकरता दिनांक १२ जानेवारीपासून दहिसर येथील भावदेवी मैदानीवर भरती प्रक्रिया सुरू आहे.

शनिवार दि ४ फेब्रुवारी रोजी या भरती प्रक्रियेअंतर्गत महिला उमेदवारांच्या भरतीसाठी अपेक्षेपेक्षा जास्त मुली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यातच भरतीसाठी आलेल्या शेकडो मुलींना उंचीचे व वेळेत न आल्याचे कारण दाखवून प्रक्रियेपासून वंचित ठेवल्यामुळे त्या मुलींनी मैदानाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू केले. आंदोलकावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे तणावाचा प्रसंग निर्माण झाला होता.

शिवसेना आमदार विलास पोतनीस व शिवसेना उपनेत्या सौ. संजना घाडी यांनी शिवसैनिकांसह तात्काळ भरती सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेतली. मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील मांजरेकर व पोलीस उपायुक्त अजयकुमार बंसल यांच्याशी चर्चा करून त्यांनी या मुलींना प्रवेश चाचणी भाग्य घेण्यास भाग पाडले. त्यामुळे अनेक मुलींना न्याय मिळाला आहे.

याप्रसंगी शिवसेना माजी नगरसेवक हर्षद कारकर, उपविभाग प्रमुख विनायक सामंत, राजू मुल्ला, विधानसभा संघटक अविनाश लाड, विधानसभा सनन्वयक प्रयेश पाटील, सुनिल शिंदे, शाखाप्रमुख अक्षय राऊत, सुधाकर राणे, अजित जाधव, शाखा समन्वयक संजय दुबे, यांच्यासह विभागातील असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here