Twitter: @maharashtracity
मुंबई: केईएम रुग्णालयात त्वचा संवर्धन पेढी सुरु करण्यात आली असून या पेढीचे उद्घाटन दिल्ली येथील राष्ट्रीय अवयव दान प्रत्यारोपण संस्थेचे (नॉटो) संचालक डॉ कृष्णन कुमार यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.
आगामी पंधरा दिवसांत या पेढीचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे केईएम रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. अवयवदान प्रत्यारोपण चवळवळीत तसेच हाडांच्या प्रत्यारोपणात त्वचेतील या उतींचे अनन्यसाधारण महत्व असून त्वचा प्रत्यारोपण प्रक्रियेला या पेढीमुळे बळकटी येणार आहे.
दरम्यान, प्लास्टीक सर्जरी सारख्या शस्त्रक्रियांमध्ये आवश्यक त्वचेतील उत्तीपेशींचे या पेढीमुळे सवंर्धन सहज होणार आहे. केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ संगीता रावत, मुंबईच्या अवयवदान प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ एस के माथुर, प्लास्टीक सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ विनिता पुरी, नोटो संस्थेखालोखाल कार्यरत असणारा रॉटो-सॉटो (पश्चिम) या अवयवदान समितीच्या संचालिका डॉ सुजाता पटवर्धन, पोटविकारतज्ज्ञ डॉ अभय शुक्ला तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
अवयवदान तसेच हाडांच्या प्रत्यारोपणात तसेच काही बाबतीत त्वचेच्या प्रत्यारोपणात ही पेढी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे नॉटो या संस्थेचे संचालक डॉ कृष्णनन कुमार यांनी सांगितले. शस्त्रक्रिया तसेच औषध निर्मितीसाठी बाळाच्या जन्मानंतर मातेच्या गर्भाशयातून निघणाऱ्या एम्निओटीक मॅम्रेनला वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड मागणी आहे. पातळ पडद्याचे निर्जंतुकीकरण करुन शस्त्रक्रिया झालेला भाग तसेच जखमांवर लावल्यास रुग्ण बरे होण्याची प्रक्रिया सुलभ होते. शस्त्रक्रियांध्ये रक्तासह कित्येकदा उत्तीपेशींचीही माणसाच्या शरीराला गरज असते. शरीरातील हे दोन महत्त्वाचे घटक आता बँकेच्या माध्यमातून संवर्धित केले जाणार असल्याचे केईएमच्या डॉक्टरांनी दिली.