उष्मा घटण्यास पोषक वातावरणात बदल

Twitter: @maharashtracity

मुंबई: गेल्या २४ तासात काही वातावरणीय बदल घडून आल्याने गुरुवारपासून थंडीची साथ (cold wave) अपेक्षित असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कमाल तापमानापासून दिलासा मिळणार आहे. याचे चित्र बुधवारी मुंबईत नोंद झालेल्या कमाल तापमानातून समोर येत आहे.

मुंबई शहरात बुधवारी २९.२ तर उपनगरात ३१.७ डिग्री सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. मंगळवारच्या तुलनेत दोन ते तीन डिग्री सेल्सिअसने तापमानात घट झालेली स्पष्ट होत आहे.

यावर बोलताना हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, आजपासून वातावरणात काहीसा बदल अपेक्षित असून हरियाणाजवळील (Haryana) वारे आता क्षीण झाले आहेत. गुरुवारपासून आगामी पाच दिवस म्हणजेच २८ फेब्रुवारीपर्यन्त पहाटेच्या किमान व दुपारच्या कमाल तापमानात सध्याच्यापेक्षा काहीशी घसरण होवून दोन्ही तापमाने सरासरी इतके किंवा किंचितशी अधिक राहण्याची शक्यता जाणवते. यातून राज्यात पुन्हा रात्रीचा हलकासा गारवा जाणवेल.

खुळे पुढे म्हणाले की, “सध्याचा असलेला दिवसाचा ऊबदारपणाही काहीसा कमी होवून दुपारचे वातावरणही सुसह्य भासण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण, खान्देश, नाशिक, नगर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात दिवसातील दुपारच्या कमाल तापमानात किंचित घसरण झालेली दिसेल. त्यामुळे तेथे दिवसातील उन्हाचा चटकाही कमी होईल.” अर्थात येथेही हे तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक असण्याची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले.

सौराष्ट्र, कच्छ व महाराष्ट्राच्या कोकणपट्टीत सध्या जमीनीपासुन दिड ते दोन किमी पर्यंतच्या हवेच्या थरात वायव्य अरबी समुद्रहून म्हणजे ओमानच्या आखातातुन घडयाळ काट्याच्या दिशेप्रमाणे वाहणारे प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे हवेचा उच्च दाब तयार झाला आहे. म्हणजेच हवेच्या घनतेत वाढ झाली.

तसेच तापलेले हे दिड ते दोन किमी जाडीचे पार्सल हवेचे पार्सल न विस्कटल्यामुळे व हरियाणाजवळ पश्चिमी झंजावातामुळे घडयाळ काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या आवर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतुन उत्तर भारतातून आपल्याकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांना गेल्या काळात अटकाव झाला. पर्यायाने या मोठ्या आकरमानाच्या हवेच्या उष्ण पार्सलमध्ये थंड वाऱ्याची सरमिसळ झाली नाही आणि कोंडलेल्या उष्णतेमुळे मुंबई, कोकणात उन्हाचा चटका कायम राहीला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here