By Milind Mane

Twitter : @manemilind70

महाड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या छत्री निजामपूर ग्रामपंचायत हद्दीतील रायगडवाडी येथे दरड कोसळून घराचे नुकसान झाल्याची घटना आज सकाळी घडली.

महाड तालुक्यात दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे दरड प्रवण क्षेत्रात दरड कोसळण्याच्या घटना चालू झाल्या असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या छत्री निजामपूर ग्रामपंचायत हद्दीत अजित धाकू अवकीरकर यांच्या राहत्या घरावर दरड कोसळून सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल खात्याने पंचनामा केला असला तरी तरी तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी त्यांनी महाड तहसीलदार कार्यालयाकडे व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here