नाते गावातील ग्रामस्थांची मागणी!

By Milind Mane

Twitter : @milindmane70

महाड: मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी संसदेत गर्जना करीत व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्यासमोर आपल्या केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा भिरकवणारे अर्थतज्ञ डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांचे मुंबईतल्या चर्चगेट रेल्वे स्टेशनला नाव देण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने (Shinde – Fadnavis government) घेतला. परंतु, महाड तालुक्यातील त्यांचे नाते (Nate Village) येतील जन्मस्थळ असणारे घर मात्र अखेरची घटका मोजत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) या घराचा  कायापालट करण्याची घोषणा केली होती, त्याचे काय झाले असा सवाल नाते गावातील ग्रामस्थ शासनाला विचारीत आहेत.

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या छुप्या मनसुब्यासाठी जाब विचारणारे चिंतामणराव देशमुख (Chintamanrao Deshmukh) यांनी आपल्या केंद्रीय अर्थमंत्री पदावर लाथ मारली होती. त्याच चिंतामण रावांचे मूळ गाव असलेल्या महाड तालुक्यातील नाते गावात त्यांचे जन्मस्थळ आहे. या जन्मस्थळाचा कायापालट करण्याची घोषणा तत्कालीन आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र अडीच वर्षात त्याची अंमलबजावणी करण्याची मानसिकता ना विद्यमान लोकप्रतिनिधींना झाली, ना रायगड जिल्ह्याच्या प्रशासनाला. 

जन्मस्थळ अखेरची घटका मोजतेय !

चिंतामणराव देशमुख यांच्या नाते येतील जन्मस्थळावर (Birth place of C D Deshmukh) म्हणजे जुन्या घराची आज पूर्णपणे पडझड झाली आहे. या घरात साप, विंचू ,उंदीर  घुशी यांनी कब्जा केला असून त्यांचे नाते येथील जुने घर आज अखेरची घटका मोजत आहे.  ते कधीही कोसळेल व जमीनदोस्त होईल अशी आज त्या घराची अवस्था झाली आहे.  त्याबाबत स्थानिक ग्रामस्थ सांगतात की या घराचे उरले सुरले अवशेष जमीनदोस्त झाले असून येत्या पावसाळ्यापूर्वी जोराचे वादळ झाले तर हे संपूर्ण घर जमीनदोस्त होण्यास क्षणाचाही विलंब लागणार नाही, अशी प्रतिक्रिया गावातील नागरिकांनी आपले नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली. 

चिंतामण रावांचे स्मारक कधी?

देशाचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाते येतील जुन्या घराचे स्मारक करण्यासाठी रायगड जिल्हा नियोजन समितीमधून (DPDC) दरवर्षी या कामासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असती तरी या घराचे उरलेसुरले अवशेष उध्वस्त होण्यापासून वाचले असते, चिंतामण रावांच्या जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला असता.  मात्र, त्याबाबत सरकारमध्ये प्रचंड उदासीनता आहे. तशीच उदासीनता रायगड जिल्ह्यातील प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये असल्यामुळे अधिकाऱ्यांनी देखील या उध्वस्त घराला वाचवण्याची त्यांना बुद्धी झाली नाही, अशी प्रतिक्रिया नाते गावातील वयोवृद्ध नागरिकांनी बोलून दाखवली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here