@maharashtracity

धुळे: पुतणीकडून विकत घेतलेल्या काकडीचे पैसे का दिले नाही, असा जाब विचारल्याने इसमाला तिघांनी मिळून बेदम मारहाण करीत त्याचा खून (murder) केल्याची भिषण घटना मंगळवारी सायंकाळी वर्षी ता.शिंदखेडा येथे घडली.

संजय निंबा कोळी रा.कोळी गल्ली, वर्षी ता.शिंदखेडा असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी तिघांच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करीत एकाला अटक करण्यात आली.

याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात युवराज लक्ष्मण मंडाले (कोळी) रा.कोळी गल्ली, वर्षी ता.शिंदखेडा याने फिर्याद दिली. त्यानुसार, दि ३ रोजी सायंकाळी ६ ते सव्वा सहाच्या सुमारास वर्षी गावातील खालची भिलाटी वस्तीत युवराज कोळीची पुतणी कु.लिना हिने काकडी विकत होती. तिच्याकडून खालची भिलाटीत राहणार्‍या प्रकाश भिमराव पांचाळ (सोनवणे), विशाल साहेबराव पांचाळ, मुकेश शाम पांचाळ यांनी काकडी घेतली. मात्र, त्याचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे युवराज कोळी आणि चुलत भाऊ संजय निंबा कोळी हे दोघे जण त्याबद्दल जाब विचारण्यासाठी खालची भिलाटी वस्तीत प्रकाश पांचाळ याच्या घरासमोर आले.

प्रकाशला काकडीचे पैसे का दिले नाही म्हणून जाब विचारला. त्याचा राग येवून प्रकाश, विशाल, मुकेश पांचाळ या तिघांनी शिवीगाळ करीत धक्काबुक्की सुरु केली. संजय कोळी समजवण्याचा प्रयत्न करीत असतांना प्रकाश पांचाळ याने हातात लोखंडी पास घेवून अंगावर धावून आला. मुकेशने संजय कोळीचे दोन्ही हात धरुन उचलून जमिनीवर पटकले. तसेच विशाल पांचाळ याने संजयच्या छातीवर बसून त्याचे डोके दोन्ही हाताने धरुन जमिनीवर आपटून आपटून संजयला जिवे ठार मारले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संजयला सोडून तिघे पळाले.

दरम्यान, याप्रकरणी नरडाणा पोलिसांनी प्रकाश भिमराव पांचाळ रा.खालची भिलाटी, वर्षी याला मध्यरात्री अटक केली आहे. तसेच तिघांच्या विरुध्द भादवि कलम ३०२ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here