Twitter : @milindmane70

महाड

महाडमधून अपहरण करून चार जणांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार दाखल होऊन आठवडा उलटला तरी आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही. याबाबत तक्रारदारांकडून पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात असून आरोपींना पाठीशी घालण्याचे काम महाड पोलीस करीत असल्याची चर्चा आहे.

महाड तालुक्यातील सवाने गावातील दीपक पांडुरंग गोपाळ याने रोहा येथील एका व्यक्तीकडून तीस लाख रुपये घेतले होते. हे पैसे वेळेत परत केले नाहीत म्हणून आरोपी ओमकार नावकर, गितेश दत्ताराम रटाटे, रोशन रटाटे, प्रशांत जाधव यांच्यासह महाडमध्ये येऊन दीपक गोपाळ याला वाहन क्रमांक  एम एच ०६ सी डी ३४२९ मध्ये भरून अपहरण केले व बेदम मारहाण केली. हा गुन्हा महाड शहरातील भर वस्तीतील चवदार तळे परिसरात दिनांक 18 जुलै रोजी घडला आहे.

याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात दीपक गोपाळ यांनी दिनांक १९/०७/२०२३ रोजी आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली. आरोपींच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाणे येथे भादवि कलम ३६५,  ३२३,५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. तक्रार आणि गुन्हा दाखल होऊन दोन आठवडे उलटले तरी अद्याप आरोपींना अटक न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here