दोघे जखमी, चौघांवर गुन्हा दाखल
@maharashtracity
महाड: महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथील मशिदीच्या परिसरामध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत दोघेजण जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. इसाने कांबळे गावात सात मे ला रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली.
याप्रकरणी अब्दुल काळसेकर (वय 24) यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार अब्दुल हे नमाजापूर्वी वजू करण्यासाठी जात असताना उन्हेस काळसेकर यांनी त्याला धक्का दिला. तेव्हा अब्दुल हा बाजूला झाला आणि त्यांनी देखील उन्हेस याला धक्का दिला. या वादातून हे प्रकरण थेट हाणामाणीवर पोहचले. मशिदीतून पठण करून बाहेर येत असताना आदिल खलील काळसेकर, आयुब अजीज काळसेकर, खलील अजीज काळसेकर आणि उन्हेस आयुब काळसेकर यानी एकत्र येत अब्दुल काळसेकर याला बेदम मारहाण करून जखमी केले. तसेच जिया काळसेकर देखील या मारहाणीत जखमी झाले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आदिल काळसेकर, आयुब काळसेकर, खलील काळसेकर आणि उन्हेस काळसेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस नाईक व्हि.एस.काळंगीरे अधिक तपास करत आहेत.