@maharashtracity
धुळे: लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय तरुणीवर लैगिक अत्याचार करीत तिला जातीवाचक शिवीगाळ करुन दमदाटी करण्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यातील (Dhule) देवपुर विटाभट्टी भागात समोर आला आहे. याप्रकरणी बलात्कार (rape), ऍट्रोसिटीचा (atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत २१ वर्षीय तरुणीने देवपुर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील विटाभट्टी, नाल्या किनारी राहणार्या शहेबाज सलीम पठाण याने त्या तरुणीला गेल्या वर्षी ऑगस्ट २०१९ मध्ये प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी शारीरीक लैगिक संबंध करुन अत्याचार केले.
त्याने देवपुरातील लवर हॉटेलच्या झोपडीमध्ये तसेच तिच्या रहात्या घराच्या मागील खोलीत, पांझरा नदी किनारी असलेल्या नवीन रोडवर विटाभट्टी जवळ तिच्याशी जबरदस्तीने संबंध करीत बलात्कार केला.
तसेच दि. ३ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री १० वाजता त्या तरुणीने शहेबाज पठाणला लग्नासाठी विचारणा केली असता त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी जातीवाचक बोलून चार चौघात पानउतारा करीत आई वडीलांसह जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
यावरुन शहेबाज सलीम पठाण, त्याची आई शाहीस्ताबी पठाण, मोठा भाऊ समीर सलीम पठाण सर्व रा.विटाभट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.