@maharashtracity

धुळे: पांझरा नदीच्या (Panzara river) पात्रात मोठ्या पुलाखाली एका ३० ते ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह (dead body of youth found) आढळून आल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. त्यामुळे जुने धुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आज शनिवारी सकाळी सात साडेसातच्या सुमारास काही लोकांना मोठ्या पुलाच्या खाली नदी पात्रात एक व्यक्ती पडलेली आढळली. तरुण मयत झालेला असल्याने तत्काळ याची माहिती देण्यात आल्याने आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांच्या तपासादरम्यान तो मृतदेह जुने धुळे परिसरातील पिंटू खुशाल चौधरी रा. सुभाष नगर, जूने धुळे (वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे) याचा असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी मयताचा भाचा संतोष चौधरी याने त्याची ओळख पटवली.

पिंटू चौधरी हा नेमका पुलावरुन खाली पडून मृत्यू झाला की आणखी काही प्रकार घडला, याचा शोध पोलिसांनी सुरु केला. त्याचा भाचा संतोष चौधरी याच्या म्हणण्यानुसार पिंटू चौधरी हा शुक्रवारी संध्याकाळपर्यंत घरी होता. नंतर तो रात्री केव्हा घराबाहेर पडला आणि त्याचा मृत्यू कसा झाला याबद्दल काहीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास आझाद नगर ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here