@maharashtracity
धुळे: मध्यप्रदेशातून (MP) अवैधपणे गावठी कट्टे खरेदी करुन ते राजस्थान (Rajasthan) येथे विक्रीसाठी घेवून जाणारी टोळी धुळे पोलिस (Dhule Police) दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करण्यात यश मिळवले.
ही मोठी कारवाई गुरुवारी सकाळी शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे गावाजवळ करण्यात आली. दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ३ गावठी पिस्तुले आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
दि. २२ रोजी सायंकाळी एलसीबीचे चे पो. नि. शिवाजी बुधवंत यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चोपडा येथून दोन इसम स्कॉर्पिओ वाहन क्र. जी.जे. ०८ वो.बो. ५०६९ मध्ये अवैधरित्या अग्नीशस्त्रे घेवून दोंडाईचा मार्ग राजस्थान कडे जाणार आहेत. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी शिंदखेडा पोलीस ठाणे हद्यीत चिलाणे गावाचे परीसरात सापळा लावला असता, २३ रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास स्कार्पिओ क्र. जी.जे. ०८ बी.बी. ५०६९ हि शिंदखेडा कडुन दोंडाईचाकडे जात असतांना पोलिस पथकास दिसली.
पथकाने अडथळा करुन सदर स्कार्पिओ थांबविली. स्कार्पिओ मधील दोन इसम हे पथकास पाहताच पळुन जाऊ लागले. त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नांव गाव विचारले असता, त्यांनी त्यांची नांवे कंवराराम केसाराम जाट वय २७. रा. १३५ अनादनी, गोदारी की ढॉंणी, कोशले की ढॉंणी तहसिल गुडामालानी जि.बाडमेर (राजस्थान) आणि विक्रमसिंग भवरसिंग राजपुत वय २१ रा. राजपुतो की ढॉंणी, सावरसर तहसिल शेरगढ जि. जोधपुर (राजस्थान) असे सांगितले.
त्यांनी सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली, परंतु मिळालेली खबर ही खात्रीशिर असल्याने स्कार्पिओ व त्यातील दोन्ही इसमास ताब्यात घेवून स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणले.
तसेच स्कार्पिओची मॅकेनिकलच्या मदतीने बारकाईने झडती घेतली असता, ड्रायव्हर शिटच्या खाली चेसीसमध्ये तयार केलेल्या कप्यामध्ये लपवून ठेवलेले तीन गावठी पिस्तुले, १६ जिवंत काडतुस मिळून आले.
हा शस्त्रसाठा आणि मोबाईल, स्कार्पिओसह एकुण ६ लाख एक हजार किंमतीचा मुद्येमाल जप्त करुन दोन्ही आरोपी विरुध्द शिंदखेडा पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपी यांनी ज्याच्याकडून पिस्टल खरेदी केले आहे त्याचा शोध सुरु असुन यापूर्वीही आरोपींनी राजस्थानमध्ये पिस्टल विक्री केली असल्याचे शक्यता आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोसई योगेश राऊत, पोसई सुशात बळवी, पोहेकॉ प्रकाश सोनार, पोहेकॉ संजय पाटील, पोना संदीप सरग, पोना कुणाल पानपाटील, पोना उमेश पवार, पोकॉ विशाल पाटील, हेको कैलास महाजन, अशांनी केली आहे.