@maharashtracity
धुळे: मागील मंजुर कामांचे धनादेश काढण्यासाठी सुमारे अडिच लाखांची लाच मागणार्या अमळनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील दोघां अभियंत्यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. यातील एका अभियंत्याला धुळे शहरातून ताब्यात घेण्यात आले.
अमळनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता दिनेश पाटील रा. पारस मंगल कार्यालयामागे, धुळे आणि शाखा अभियंता सत्यजीत गांधलीकर या दोघांनी तक्रारदाराकडून त्याच्या कंपनीच्या मागील मंजुर कामाच्या धनादेश मंजुरीसाठी 2 लाख 58 हजार रुपयांची लाच मागीतली होती. दि.8 जून 2021 ला दिनेश पाटीलने 98 हजार तर सत्यजीत गांधलीकरने 1 लाख 60 हजाराची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
यानंतर लाचलूचपतचे उपअधीक्षक सुनिल कुराडे, निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, हवालदार प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, शरद काटके, कैलास देवरे, सुधीर मोरे, महेश मोेरे, संतोष पावरा, संंदीप कदम, पुरुषोत्तम कदम, गायत्री पाटील यांच्या पथकाने उपविभागीय अभियंता दिनेश पाटीलला धुळ्यातून तर गांधलीकरला अमळनेर येथून अटक केली.