By डॉ प्रशांत भामरे

@dr_prashantsb

सध्या देशात आणि राज्यात कोरोनाची (coronavirus) दुसरी लाट आलेली आहे. पहिल्या लाटेपेक्षाही ही दुसरी लाट भयानक आहे. आता हा व्हायरस अत्यंत जोरात पसरतो आहे, बेड्स (beds) उपलब्ध नाहीत, ऑक्सिजन (Oxygen), रेमडेसीविर (Remdesivir), व्हेंटीलेटर्स (Ventilators), तज्ञ उपलब्ध नाहीत, याची चर्चा सर्वच करत आहेत. त्याबद्दल दर तासाला टीव्हीवर दाखवलं जात आहे. सोशल मीडियात (social media) लिहिलं जात आहे. वाचलं, ऐकलं जात आहे. पण या सर्व प्रक्रियेत व्हायरस किती स्ट्रॉंग आहे, तो आपल्याला काय करू शकतो याचीच चर्चा करत आहोत. आपण काय करू शकतो, याचा मात्र विचारही करत नाही. 

आपण आपल्या अवचेतन/ सुप्त मनाची (subconscious mind) ताकद वापरून आपण कोरोनाला सहज पराभुत करू शकतो. कसे ? त्यासाठी आपल्याला आपलं मन म्हणजे काय ? ते कसं काम करतं ? त्याचा आपल्या शरीरावर काय प्रभाव पडतो ? त्याची अनुभुतीतील उदाहरणे काय आहेत ? या सर्व बाबी समजुन घ्याव्या लागतील. 

हजारो वर्ष पाश्चिमात्य वैद्यकशास्त्र असं गृहीत धरून चालत होतं कि शरीराच्या कामकाजात मेंदू हा सर्वोच्य स्थानी आहे आणि मेंदूच शरीरातील सर्व अवयव, स्नायु, पेशी, सर्व संस्था यांना आदेश देऊन त्यांना नियंत्रित करतो. 

त्या संकल्पनेला पहिला छेद दिला तो डॉ सिगमंड फ्रॉइड (Dr Sigmund Freud) या आस्ट्रियन (Austrian) न्युरॉलॉजिस्टने (Neurologist). हि घटना सुमारे सव्वाशे वर्षापूर्वीच्या काळातील आहे. न्यूरॉलॉजिस्ट म्हणून मेंदूची संरचना आणि त्यांची कार्ये याबाबत डॉ सिगमंड फ्रॉइड यांचा सखोल आणि दैनंदिन अभ्यास होता. त्यांना त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या पेशंट्सवर उपचार करताना असे लक्षात आले कि मेंदूपेक्षाही काहीतरी मोठी शक्ती मानवात वास करते. कारण अनेक बाबी आणि समस्या यांचे उत्तर मेंदूत सापडत नाहीत. त्यावर त्यांनी प्रयोग सुरु केले. 

अनेक अनाकलनीय व्याधींमध्ये त्यांनी रुग्णांना पडणारी स्वप्ने, त्यांचा भुतकाळ याविषयी रुग्णांशी बोलायला सुरुवात केली. त्यांच्या अवचेतन अवस्थेत येणाऱ्या बाबी ( जसे कि स्वप्न इत्यादी ) याद्वारे त्यांनी त्यांच्यात खोलवर गेलेल्या गोष्टी त्यांच्याशी बोलुन, त्यांचे कौन्सिलिंग करून मोकळ्या करण्याचा, त्यांना त्यातुन मुक्त करण्याचा प्रयोग त्याने करून पहिला. त्या प्रयोगाचे अत्यंत अनपेक्षित परिणाम दिसुन येऊ लागले. 

त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी एका 21 वर्षीय मुलीला जुनाट खोकल्याची अत्यंत टोकाची उबळ येण्याचा जुना आजार होता, कोणत्याही उपचाराला तो आजार दाद देत नव्हता, तिच्यावर हे प्रयोग केले. त्यात त्या मुलीचे वडील दुर्धर रोगाने आजारी असताना त्यांची ती सुश्रुषा करीत असताना तिच्या मनात खोलवर काही घटना कोरल्या गेल्या होत्या, जाऊन बसल्या होत्या. त्यासंदर्भात तिला बोलतं करून, त्याबाबतीत तिला कौन्सिलिंग केल्यावर कोणत्याही उपचाराविना, औषधांविना तो आजार बरा झाला. 

या अशा अनेक प्रयोगातुन त्याने हा शोध लावला कि मेंदुपेक्षाही एक मोठी ताकद मानवी शरीरात संचार करते आणि तीच शरीरातील सर्व कामकाज नियंत्रित करते. ही प्रक्रिया ती ताकद मेंदूमार्फत पार पाडून घेते. त्या ताकदीला मन (mind ) असे नाव देण्यात आले. हे अदृश्य असते, शरीराचे विच्छेदन केले तर माईंड किंवा मन असा कोणताही अवयव अस्तित्वात असल्याचे दिसुन येत नाही. 

पाश्चिमात्य वैद्यकशास्त्राला या संकल्पनेचा शोध अगदी अलीकडच्या काळात लागलेला असला आणि त्याचा त्यांनी त्यांच्या उपचारपद्धतीत अगदी अलीकडे समावेश केलेला असला तरी भारतीय वैद्यकशास्त्रात (medical science) मनासारखी शक्ती अस्तित्वात आहे हे हजारो वर्षांपासून ज्ञात होते. आपल्याकडे पतंजली (Patanjali) पासून या संकल्पनेवर आधारित उपचारपद्धती (therapy) अस्तित्वातच होती. महात्मा गौतम बुद्धांनी (Gautam Buddha) तर मानवी आकलनापलीकडे यात संशोधन करून ठेवले आहे. तर त्या संकल्पनेला माईंड हे नाव कशावरुन देण्यात आले त्याबद्दल विविध तर्क वितर्क आहेत. त्यातला एक असा आहे कि संस्कृत (Sanskrit) शब्द मानस वरून माईंड हे नाव देण्यात आले आहे. 

आता पाश्चिमात्य विज्ञान मन या संकल्पनेबद्दल, त्याच्या कार्यपद्धतीबद्दल, त्याच्या शरीरावरील प्रभावाबद्दल गेली सव्वाशे वर्ष संशोधन करीत आहे. मग आपण आतापर्यंत मनाबद्दल किती संशोधन करू शकलो आहोत ? समजा माणसाच्या मनाची व्याप्ती हि पृथ्वीवरच्या पाचही महासागरांएवढी आहे असे जर आपण गृहीत धरले तर आपण आताशी कुठे बीचवर पोहोचलो आहोत आणि फक्त आपले तळपाय बुडतील इतक्या पाण्यात गेलो आहोत. इतकीच माहिती आपल्याला या मनाबद्दल झालेली आहे. म्हणजे या सर्व मनरूपी अथांग महासागरांमध्ये काय काय रहस्य दडलेली आहेत त्याबद्दल अजुनही काम सुरूच आहे. 

पण आतापर्यंत केलेल्या संशोधनात आपण काही अत्यंत महत्वपूर्ण आणि मूलभूत बाबी शोधून काढल्या आहेत. त्यात मनाची रचना कशी आहे, मनाचे आणि त्याच्या अंगांचे कार्य काय, ते कशा पद्धतीने चालते, त्याचा शरीरावर कसा प्रभाव पडतो यासारख्या महत्वपुर्ण बाबी आता लक्षात आलेल्या आहेत. त्याचा वापर करून अनुकुल परिणाम साधून घेण्यास मदत होते आहे. या बाबी इतक्या सध्या सोप्या आहेत कि त्या जर आपण समजुन घेतल्या तर आपल्या आयुष्यात आपण अमुलाग्र बदल घडवून आणू शकतो. त्या काय आहेत आणि त्याचा दैनंदिन वापर कसा करता येईल ते समजावून घेऊ.

१. मनाची रचना – मनाचे सर्वसाधारणपणे दोन भाग असतात – एक बाह्य मन ( ज्याला आपण कॉन्सियस माईंड किंवा चेतन मन सुद्धा म्हणतो) दुसरे अंतर्मन ( ज्याला आपण सबकॉन्सियस माईंड किंवा अवचेतन अथवा सुप्त मन सुद्धा म्हणतो). अंतर्मनाचे पुन्हा दोन भाग पडतात – बाह्य अंतर्मन आणि अंतर अंतर्मन. 

२. मनाच्या विविध भागांची कार्ये आणि भूमिका  – मनाच्या विविध भागांची निश्चित अशी कार्ये आहेत आणि ती कधीच बदलत नाही. पहिले आपण पाहू कि बाह्यमनाचे कार्य आणि भुमिका काय आहे ? बाह्य मन हे अत्यंत चंचल आणि अस्थिर स्वरूपाचे आणि भिरभिरते असते. आपल्याला एका क्षणात जे हजारो, विविध ठिकाणचे, प्रकारचे, भावनांचे, प्रसंगांचे, घटनांचे विचार येतात ते या बाह्य मनामुळेच असतात. बाह्यमनाचे काम हे माहिती गोळा करणे, तिचे पृथकरण करणे, माहितीचे विश्लेषण करणे आणि निष्कर्ष काढणे हे असते. 

बाह्य मनाची भूमिका ही अशा प्रकारे माहिती गोळा करून, तिच्यावर प्रक्रिया करून, त्याआधारे निष्कर्ष काढून तो अंतर्मनाकडे पाठवणे ही असते. अंतर्मन हे बाह्य मनाच्या अगदी विपरीत असते. ते अत्यंत स्थिर आणि दृढ असते. त्याचे प्रमुख काम हे बाह्यमनाने काढलेल्या (आणि त्याच्याकडुन प्राप्त झालेल्या) निष्कर्षांची मेंदूकडून तंतोतंत आणि कठोरपणे अंमलबजावणी करून घेणे हे असते. 

बाह्य मनाकडून जे आदेश, निष्कर्ष प्राप्त होतात त्यात कोणताही बदल न करता अंतर्मन त्याची मेंदुकडुन तंतोतंत अंमलबजावणी करून घेते. मघाशी सांगितल्याप्रमाणे अंतर्मनाचे सुद्धा जे दोन भाग असतात त्यापैकी बाह्य अंतर्मन ही भूमिका पार पडते. 

मग अंतरांतर्मनाची भूमिका आणि कार्य काय असतात ? तर अंतरांतर्मन हे आयुष्यभर असे जे निष्कर्ष बाह्यमनाकडून प्राप्त होतात त्यातील महत्वाचे निष्कर्ष नोंदीत करून कायमस्वरूपी जतन करून ठेवते. आपण सध्या जे काही असतो म्हणजे आपण कसे कपडे घालणार, कसे वागणार बोलणार, विशिष्ठ परिस्थितीत कसे रिऍक्ट करणार, आपला स्वभाव कसा असणार या सर्व बाबी या अंतरांतर्मनातील या नोंदींवर अवलंबून असतात. थोडक्यात आज तुमचे जे व्यक्तिमत्व आहे ते या अंतराअंतर्मनातील नोंदींचे प्रतिबिंब असते. 

आपल्या मनाची रचना आणि कार्य याबाबतची आकृती खाली दिलेली आहे ती कृपया पाहावी म्हणजे आपल्या तातडीने लक्षात येईल. 

आता हे प्रत्यक्षात कसे घडते हे पाहुया. आपल्याला साधा बोटाला चटका लागला तरी प्रचंड वेदना होतात. ती स्मृती आपल्या मनात कायमची कोरली जाते आणि आपण आग, गरम वस्तू , निखारे यापासुन कायम लांब राहतो, सावध राहतो. पण आपण समाजात पाहतो कि दरदिवशी कित्येक व्यक्ती स्वतःला जाळुन घेऊन आत्महत्या करतात. मग हे कसे होते ? कारण ती व्यक्ती ज्या परिस्थितीतून जात असते त्याबद्दल तिच्या बाह्य मनाने घेतलेला निर्णय अंतर्मन निष्ठुरपणे मेंदूकडून अमलात आणून घेते.

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला व्यवसायात प्रचंड मोठी खोट बसते, तोटा होतो. सर्व व्यवसाय संपतो, प्रचंड कर्ज होतं, बाजारात पत राहत नाही, घरदार, चल अचल संपत्ती गहाण पडलेलं असतं, मुलांचं शिक्षण सुरु असतं, मुलगी लग्नाची असते. मग त्याचं बाह्य मन ही सर्व माहिती गोळा करते, त्याच पृथकरण करते, विश्लेषण करते, त्याच्यावरून निष्कर्ष काढते कि आता सर्व संपलं, आता काही खरं नाही, यातून आपण बाहेर पडूच शकत नाही, असं मानहानीकारक जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आणि ते अंतर्मनाला आदेश देते “आता जीवन संपवायचं आहे, अंगावर रॉकेल/ पेट्रोल टाकुन जाळून घेऊ, मग सर्व संपेल. अंतर्मन आगीमुळे बसणाऱ्या चटक्यांची, होणाऱ्या वेदनांची पूर्णपणे जाणीव असतानाही त्या सुचनेची, आदेशाची निष्ठुरपणे मेंदूकडून अंमलबजावणी करून घेते, लोक स्वतःच्या हाताने अंगावर रॉकेल टाकून, काडी ओढुन स्वतःला आग लावतात, जीवन संपवतात. 

हे अधिक सुलभ व्हावं, नीट समजावं म्हणुन मी आता इथे तीन उदाहरणं देणार आहे. त्यातलं पहिलं हे माझ्यासोबत घडलेलं आहे, दुसरं मेडिकल मिरॅकल म्हणुन नावाजलेलं आहे आणि तिसरं आपण ज्याचे अनेकदा प्रयोग पाहिलेले असतील असं संमोहनाच्या कार्यक्रमाचं आहे. 

अ ) दोन वर्षांपुर्वी मी एका परीक्षेची तयारी करत होतो. कार्यालयीन कामाच्या व्यापामुळे तयारीला फारसा वेळ मिळाला नाही म्हणून जे काही शेवटचे चार पाच दिवस हाताशी लागले त्यात रात्रीचा दिवस करून अभ्यास करायचा प्रयत्न करत होतो. पहाटेपर्यंत जागणे, अल्पशी झोप घेऊन पुन्हा तयारीला लागणे असा दिनक्रम झालेला. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. 

एके दिवशी सायंकाळी साधारणतः आठ वाजेच्या सुमारास मला प्रचंड ऍसिडिटी झाली. अगदी आता उलटी होईल इतका त्रास होत होता, प्रचंड डोकेदुखी, अस्वस्थता होती. इतक्यात आमच्या अर्धांगिनी माझ्या अभ्यासाच्या खोलीत आल्या आणि मला म्हणाल्या जेवण तयार आहे, तुम्ही जेऊन घेता का ? मी म्हणालो जेवण सोड मी आता घोटभर पाणी पिलो तरी मला भळभळून उलटी होईल अशी भावना आहे, तु मला एखादी अँटासिड गोळी दे. आमच्या घरात कोणालाही ऍसिडिटी वगैरेचा त्रास सहसा होत नाही म्हणुन गोळी घरात असतेच असे नाही. सौभाग्यवतींनी थोडी शोधाशोध केली आणि मला म्हणाल्या कि घरात गोळी नाहीये मी संकेतला (आमचा सारथी) आणायला सांगते. मी म्हणालो जरा पटकन आणायला सांग खुप त्रास होतोय. १५ मिनिटांनी संकेत गोळी घेऊन आला. तो माझ्या अभ्यासाच्या खोलीत आला तेव्हा मी फोनवर बोलत होतो. फोन ठेवल्यावर तिथे आधीच भरून ठेवलेला पाण्याचा ग्लास मी प्यायलो. २०-२५ मिनिटांनी माझी ऍसिडिटी झपझप उतरली. अर्ध्या तासाने तर ऍसिडिटी पुर्ण गेली आणि मला कडकडून भूक लागली कारण मी ऍसिडिटीचा भावनेमुळे दुपारपासून काहीही खाल्लेलं नव्हतं. मी अधाश्यासारखा जेवलो आणि हात धुऊन थोडावेळ पडुन पुन्हा अभ्यासाला लागावं या विचाराने बेडरूम मध्ये गेलो आणि पाहतो तो काय संकेतने आणलेली अँटासिड गोळीची अखंड स्ट्रीप साईड टेबलवर जशीच्या तशी पडली होती, त्यातली एकही गोळी घेतली नव्हती. 

मग हे झालं कसं ? झालं असं कि, संकेत गोळी घेऊन येणार आहे हे माहित असणं, तो आला तेव्हा मी फोनवर बोलत असणं, फोन संपल्यावर मी पाण्याचा ग्लास पिणं हि सर्व माहिती प्रोसेस करताना माझ्या बाह्य मनाची गल्लत झाली आणि मी जणुकाही आता गोळी घेतली आहे अशा समजुतीने त्याने अंतर्मनाला आदेश दिला आता गोळी घेतली आहे आता ऍसिडिटी जाणारच. अंतर्मनाने त्या आदेशाचे चोख पालन मेंदुकडुन करून घेतले! 

हे थोडंसं प्लासिबो इफेक्ट् (Palcebo Effect) सारखं झालं. औषध घेतल्याचा माझ्या मनाचा झालेल्या गैरसमजाचा माझ्या शरीरावर औषध घेतल्यासारखाच परिणाम माझ्या मनाने घडवून आणला. 

ब ) दुसरं उदाहरण आहे एका ल्युकेमियाच्या (Leukemia) रुग्णाचं. फार पूर्वी कधीतरी वाचलेलं. एका कॅन्सर रुग्णालयात (cancer hospital) एक 27 वर्षाचा ल्युकेमियाचा (रक्ताचा कर्करोग) पेशंट होता. ल्युकेमिया अत्यंत ऍडव्हान्स स्टेजला होता. सर्व इलाज थकले होते. आता मोजके १०-१५ दिवस शिल्लक आहेत असे डॉक्टरांचे मत होते.

रुग्णाच्या नातेवाईकांना सांगण्यात आले कि कोणी रुग्णाला शेवटचे भेटू इच्छित असतील तर बोलावून घ्या, कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं. एका रात्री आयसीयु (ICU) मध्ये तो रुग्ण औषधांच्या प्रभावाखाली अर्धवट ग्लानी, अर्धवट झोपेत असताना त्याला जिझस (Jesus Christ) प्रकट झालेला दिसले. देव त्याला म्हणाला, “अरे वेड्या, या डॉक्टरांना माझ्यापेक्षा जास्त समजतं का? मी तुझं आयुष्य माझ्या हातानी ८० वर्ष लिहिलेलं आहे, तू कसा काय इतक्यात मरू शकतो?” आणि ते अदृष्य झाले.

तरुण भानावर आला आणि आरडाओरडा करत त्याने बेल वाजवायला सुरुवात केली. डॉक्टर, नर्स वगैरे काय झालं म्हणून बघायला पळत त्याच्या रूममध्ये आले. तो डॉक्टरांना म्हणाला कि तुमचं काहीतरी चुकतंय. आता तुम्ही उभे आहात तिथे जिझस ५ मिनिटांपूर्वी उभा होता आणि त्यानेच मला सांगितलं कि मी ८० वर्ष जगणार आहे. डॉक्टर, नर्सनाही वाटलं कि बिचारा तसाही जाणारच आहे तर त्याला देव भेटल्याच समाधान तरी असू द्यावं. म्हणून ते त्याला म्हणाले कि तू किती नशीबवान आहेस. देवाला प्रत्यक्ष पाहिलंस. मी तर दर रविवारी संडे मासला (Sunday Mass) न चुकता चर्चमध्ये (Church) जातो. मलातर देव कधीही स्वप्नातसुद्धा आला नाही वगैरे म्हणून त्यांनी त्याचं समाधान केलं. आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवसापासून त्याचा ल्युकेमिया रिग्रेस म्हणजे कमी कमी होऊ लागला आणि तो पूर्णपणे बरा होऊन घरी परत गेला. 

हे कसं घडलं हे एक आश्चर्यच बनून राहिलं. पण देवावरची अत्याधिक श्रद्धा, तो घडलेला अतिविशिष्ठ प्रसंग याने प्रभावित होऊन त्याच्या बाह्यमनाने त्याच्या अंतर्मनाला आदेश दिला कि देवाने सांगितलंय आपण ८० वर्ष जगणार आणि त्याच्या अंतर्मनाने मेन्दुमार्फत स्वतःच्याच शरीराची रोगप्रतिकारशक्ती आणि यंत्रणा कामाला लावून तो असाध्य आजार बरा करवून घेतला ! 

क ) संमोहनाचे (Hypnotism) अनेक प्रयोग आपण पाहतो. आता तर युट्युबवर (Youtube) सुद्धा खुप व्हिडीओज उपलब्ध आहेत. संमोहनात असं तंत्र वापरलं जातं कि त्याद्वारे त्या व्यक्तीचे किंवा व्यक्तींचे बाह्यमन हे निष्प्रभ केले जाते. आता यात गम्मत अशी आहे कि अंतर्मन स्वतः कोणतेही निष्कर्ष काढु शकत नाही, आदेश निर्माण करू शकत नाही. त्याला निष्कर्ष सांगणारा, आदेश, सुचना देणारा कोणतातरी घटक लागतोच. 

मग हिप्नोसिस च्या प्रयोगात जो इन्स्ट्रक्टर असतो तोच अंतर्मनासाठी बाह्यमनाच्या भुमिकेत जातो आणि अंतर्मन त्याने दिलेल्या सुचनांचे पालन करू लागते. मग आपण बघितले असेल कि हिप्नोट्रान्स मध्ये गेलेल्या व्यक्तीला हिरवीगार मिरची खाण्यासाठी देतात, त्याला सुचना दिली जाते कि तु पेढा खाणार आहेस. त्याने मिरची खाल्ली कि त्याला विचारतात कसा होता पेढा ? मग तो सांगतो कि फार गोड होता, रवाळ होता वगैरे. आता मिरची खाणाऱ्याला पेढ्याच्या चवीची अनुभुती कशी येते ? तर अंतर्मनाला सुचना मिळालेली आहे कि आपण पेढा खाणार आहोत आणि तो गोड आणि रवाळ असतो. अंतर्मन तोंडात तिखट मिरची असतानासुद्धा मेंदुकडुन गोड संवेदना नोंदवून घेतो. इतकी ताकद अंतर्मनात आहे. या पोष्ट सोबत एक हिप्नोसिस च्या प्रयोगाचा व्हिडीओ टाकला आहे. त्यातसुद्धा हिप्नोसिस करणारा त्यात भाग घेणाऱ्याना सुचना देतो कि तुम्ही बीचवर आहात आणि तुम्हाला प्रचंड उकडतंय, पहा ते कसे वातानुकुलीत सभागृहात असुनसुद्धा कसे लगेच तोंडाला हाताने वारा द्यायला सुरुवात करतात. आणखी अनेक गमतीजमती त्यात आहेत. नक्की पहा म्हणजे हे सर्व किती ताकदीने प्रत्यक्षात होतं हे तुमच्या लक्षात येईल. 
आता हे सर्व विवेचन करायचं कारण असं कि ही सर्व प्रक्रिया नीट समजली पाहिजे म्हणजे तिचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल, करून घेता येईल. 

#कोरोना_सुप्त_मनाची_शक्ती_आणि_आपण -: सध्या देशात आणि राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. पहिल्या लाटेपेक्षाही हि…

Posted by Prashant Bhamare on Saturday, 1 May 2021

तुम्हाला वाटू शकतं कि याचा आणि कोरोनाचा काय संबंध ? तर फार मोठा संबंध आहे. देशात आतापर्यंत सुमारे १ कोटी ९१ लाख लोकांना कोविडने (covid-19) बाधित केले आहे. त्यांना कोरोना झाला आहे. देशाची लोकसंख्या १३५ कोटी पेक्षा जास्त आहे. आपल्याकडे शहरं तसेच ग्रामीण भागातही अत्यंत दाट लोकवस्ती असते आणि लोक एकमेकांच्या अतिशय सानिध्यात असतात. म्हणजे व्हायरसला एक्स्पोज होऊनही मोठी लोकसंख्या अद्याप आजारापासून मुक्त राहिली आहे. बरं जे लोक आजारी पडलेत त्यातसुद्धा आपण पाहिलंच आहे कि अनेक तरुण, बॉडीबिल्डर्स, कोणतीही सहव्याधी  नसलेले (डायबेटीस, रक्तदाब वगैरे ), मॅरेथॉन रनर्स लोकं आजारात पराभूत झाले. आपल्याला सोडून गेले आणि दुसऱ्या बाजुला ८०, ९०, १०० वर्षांचे, सहव्याधी असलेले आणि सिटी स्कोर १७, २०, २३ असलेले लोक या आजारातून लीलया बाहेर आलेले आहेत. मग व्यक्तिपरत्वे आणि स्थापित सिद्धांताच्या विरुद्ध व्यक्तींनी व्हायरसला दिलेल्या झुंजीत, प्रतिसादात एव्हढा फरक असण्याचं कारण काय असावं ? 

त्याच गमक/ रहस्य आपल्या मनात आहे. सर्वसाधारणपणे कोविड / कोरोना या आजारावर उपचाराच्या ठराविक पद्धती आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे कि व्हायरस विरुद्ध कोणतेही प्रभावी आणि निश्चित परिणामकारक औषध उपलब्ध नाही. सध्या जे उपचार सुरु आहेत ते प्रामुख्याने तीन प्रकारचे आहेत. 

१) लक्षणांवर उपचार म्हणजे सर्दी असेल तर सर्दीचे औषध, ताप असेल तर अँटी पायरेटीक्स 
२) इम्युनिटी बुस्टर्स (रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे) (Immunity boosters)  जसे कि व्हिटॅमिन सी, कोबडेक्स वगैरे 
३) आणि तथाकथित अँटिव्हायरल रेमडेसीविर वगैरे. 
पण प्रामुख्याने तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन (Viral Infection) मधुन बरी करते ती तुमची स्वतःची इम्युन सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकारशक्ती. तोच एक अत्यंत खात्रीलायक मार्ग आहे. 
इम्युन सिस्टीम हे इन्व्हॉलंटरी फंक्शन असल्यामुळे त्याला चेतन मनातुन संदेश जात नाही पण आपल्या अवचेतन/ सुप्त मनात ती क्षमता असते. आपल्या शरीरातल्या सर्व क्रियांचे व्हॉलंटरी आणि इन्व्हॉलंटरी असे दोन प्रकारे वर्गीकरण केले जाते. व्हॉलंटरी म्हणजे ऐच्छिक क्रिया ज्या आपण प्रत्यक्षरित्या नियंत्रित करू शकतो जसे कि हात पाय हलवणे, आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्यापद्धतीने हातापायांची हालचाल होते. आपण ठरवलं कि हात वर उचलायचा कि लगेच हात वर उचलला जातो. पण काही क्रिया आपल्या नियंत्रणाबाहेरील असतात जशा कि हृदयाचे ठोके, रक्तदाब इत्यादी. त्या आपण आपल्या इच्छेप्रमाणे कमीजास्त करू शकत नाही, त्यांना इन्व्हॉलंटरी फंक्शन किंवा अनैच्छिक क्रिया असं म्हटलं जातं. 

आपण हे सर्व शाळेत शिकलो आहोत. आपले सर्व इन्व्हॉलंटरी फंक्शन्स हे अवचेतन मनातूनच चालतात. अवचेतन मनात सूचना निर्माण करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. योग आणि प्राणायामाद्वारे, विपश्यनेद्वारे आपण बाह्यमनावर ताबा मिळवू शकतो आणि त्याद्वारे बाह्यमन काय निदेश/ सुचना/ आदेश अंतर्मनाला देणार आहे ते नियंत्रित करू शकतो. 
सेल्फ हिप्नोसिस हा एक मार्ग आहे.  ते करण्याचे अनेक साधने आहेत. त्यापैकी एक प्रभावी साधन म्हणजे योगनिद्रा आहे. एकदा अवचेतन मनाने तुमच्या ईम्युन सिस्टिमला आपल्याला या व्हायरसला संपवायचेच आहे अशी सूचना दिली कि इम्युन सिस्टीम ते करतेच. इम्युन सिस्टीमचे कामच अवचेतन मनाच्या सूचनांची अंमलबजावणी करणे हे आहे. तुमच्यासाठी योगनिद्राचा ऑडिओ शेअर केला आहे. तात्काळ योगनिद्राचे सेशन करा. अल्पकाळात फरक पडेल. योगनिद्रेत तुम्ही जो संकल्प कराल तो तुमचे सुप्तमान/ अंतर्मन/ अवचेतन मन तत्काळ मेंदुमार्फत अंमलबजावणीत आणेल.

जे लोक अनेक सहव्याधी बाधित असूनही, वय झालेलं असूनही , सिटी स्कोर १५ पेक्षा खुप जास्त असूनही ठणठणीत बरे झालेत, त्यांनी आज आपल्याला इथे मरायचे नाहीये हे आपल्या अंतर्मनाला ठणकावून सांगितले होते. म्हणुन हा जीवघेणा आजार त्यांचं काहीही बिघडऊ शकला नाही, ते ठणठणीत बरे झाले. 

हजारो वर्षांपासून भारतीय उपचारपद्धतीचा भाग असलेलं हे तंत्र आपण आत्मविश्वास वाढविणे, भीती घालविणे, स्मरणशक्ती वाढविणे, आकलनक्षमता वाढविणे, व्यसनमुक्ती, ताणतणाव घालवणे, ऍक्झायटी, सवयी बदलणे यासारख्या अनेक विषयात आणि आपणास वाटेल त्या व्याधीत प्रभावीपणे वापरू शकतो. माझ्या एका मित्राने याच तंत्राचा वापर करून आपला रक्तदाब ( बीपी ) पुर्णपणे नियंत्रणात आणला आहे. करोनाकाळात आपण याचा वापर करून आपण नकारात्मक बातम्या, वृत्त, त्यामुळे मनात निर्माण झालेली भीती यावर मात करू शकतो. ज्यांना आजार झाला आहे ते आजारांवर मात करण्यासाठी शक्ती निर्माण करू शकतात. जे अद्याप या आजारापासून सुरक्षित आहेत ते स्वतःच्या रोगप्रतिकार शक्तीला अधिक सक्षम करू शकतात, नकारात्मक मानसिकता, भीतीच्या छायेतुन बाहेर पडु शकतात, रोगप्रसार होऊ नये म्हणुन ज्या गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत (जसे कि मास्क घालणे, हात निर्जंतुक करत राहणे, सामाजिक अंतर पाळणे) या सुचना काटेकोरपणे पाळल्या जातील अश्या सवयी पाडून घेऊ शकतात. 

हे एक अत्यंत ताकदवान तंत्र आपल्याला आपल्या संस्कृतीने दिलेले आहे, त्याचा आपण खुबीने वापर करून घेतला पाहिजे. आपल्या पूर्वजांनी ज्या म्हणी तयार केल्या आहेत त्या अतिशय समर्पक आणि हजारो वर्षांच्या व्यावहारिक निरीक्षणातून आलेल्या आहेत, तयार झालेल्या आहेत. भित्यापाठी ब्रम्हराक्षस ही म्हण यावरच आधारित आहे. ज्याची आपण भीती बाळगतो, सारखा विचार करत राहतो तसेच आपल्यासोबत होते. 

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।
मने प्रतिमा स्थापिली । मने मना पूजा केली । मने इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ।।
मन गुरु आणि शिष्य । करी आपुलेचि दास्य । प्रसन्न आपआपणास । गती अथवा अधोगती ।।
साधक वाचक पंडित । वक्ते श्रोते ऐका मात । नाही नाही आन दैवत । तुका म्हणे दुसरे ।।
तुकाराम महाराज म्हणतात की अहो लोकहो येथे मनुष्याकडे सर्वात मुख्य आणि महत्वाचे जे काही असेल ते म्हणजे त्याचे मन आणि ते जर प्रसन्न असेल, आनंदित असेल तर मग तेच सर्व सिद्धीचे कारण देखील ठरते. त्याच्या अवस्थेवरूनच मग आपण ह्या संसाराच्या बंधनात अडकतो किंवा मोक्षाला जातो, म्हणून ते नेहमी व सदैव कसे प्रसन्न राहील ते पहावे. त्याला चांगल्या आणि योग्य गोष्टी देऊ करून त्याचा व्यवस्थित सांभाळ करावा. कारण शेवटी तेच तुमच्या सर्व इच्छा पुरविणार असून तेच तुम्हाला सुख आणि समाधान देखील देणार आहे.  ते पुढे म्हणतात की, असे हे आपले मन ज्यावर जडते मग त्याचीच प्रतिमा ते आपल्या मनात तयार करते, मग मनानेच आपण आपल्या मनाची पूजा करतो आणि मग हे मनच आपल्या सर्व इच्छा-आकांशा पुरविते आणि असे हे सर्व लाड पुरवणारे मनचं आपली मग माउली होते. 

ते पुढे म्हणतात की हे मनच मग प्रसंगी आपले गुरु होते किंवा आपणच शिष्य होते आणि एकदा का हे आपल्या ताब्यात आले की मग हेच आपले दास्य देखील करते आणि ज्या व्यक्तीने जसा स्वतःच्या मनाचा सांभाळ केला असेल किंबहुना जसे ते एखाद्यावर प्रसन्न असेल तसे ते त्या त्या व्यक्तीला मग गती किंवा अधोगतीला घेऊन जाते. 

तुकोबाराय शेवटी म्हणतात की अहो लोकहो आणि त्याबरोबर ह्या समाजातील सर्वच वाचक, पंडित आणि साधक तसेच वक्ते आणि श्रोतेजन तुम्ही सुद्धा हेच लक्षात घ्या की आपल्या मनासारखे दुसरे दैवत आपल्याला शोधूनही सापडणार नाही कारण आपले मनच आपल्याला नेहमी दिशा दाखवते म्हणूनच ते निरोगी व प्रसन्न ठेवणे हे आपले मुख्य कर्तव्य आहे. 

डॉ प्रशांत भामरे

(लेखक हे सामाजिक न्यायमंत्री यांचे खाजगी सचिव आहेत. संविधान आणि मानसशास्त्र यावर प्रभुत्व असलेल्या या लेखकानेकोरोनावर त्यांनी यशस्वी मात केलेली आहे. )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here