केंद्र म्हटलं तेंव्हा राज्य
१८ वर अडून बसलं,
केंद्र होताच बाजूला
राज्य ३० च्या वर गेलं !!

सरसकट द्यायची लस
वयाची अट कशाला?
ओरडून झालं सारं आता
कोरड पडली घशाला…

लस धोरण पहा यांचे
एकमत अजून होईना
कोर्ट झालं संतप्त
तोवर दृष्टी येईना…

मनमानी होती पद्धती
होतं तर्कशुन्य धोरण
तोवर रचली ‘सरण’ खूप
भोगल्या यातना मरण…

तेंव्हा कुठं आलं आता
मोफत पहा लसीकरण
गाव-शहरी दिसेल आता
लसीकरणाचे तोरण !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here