@maharashtracity
महाविद्यालये,विद्यापीठांना
फतवा ‘युजीसी’चा आला
लसी होताच मोफत सुरू
फलक लावा ‘मोदी’ गुरू
भूतकाळात लसीकरणाचा
जयकार असा झालाका
देश सारा जाहिरातीत
साहेब कधी न्हाला का
मोफत लस दिली म्हणूनका
आभारही मारून मुटकून ?
सचिव जैन साहेब अहो..
गेलं काहो तुमचं सटकुन
मृत्यूचे झाले तांडव
लस तेंव्हा कुठं होती?
पश्चिम बंगाल मध्ये बघा
नाचणारी हीच भूतं होती.
साहेब सचिव जैन आपण
खरं प्रतिक भक्ताचं
दिसलं नातं भाजपाशी
अस्सल तुमच्या रक्ताचं !!