५ लाखापेक्षा जास्त डाऊनलोड्स; १ लाख अमेरिकन डॉलर एवढा विक्रमी मासिक महसूल

मुंबई: महामारीमुळे मनोरंजन उद्योग ठप्प झाला तेव्हा ऑनलाइन कंटेंट निर्मितीमध्ये प्रचंड वाढ झाली. जेएल स्ट्रीम हे एक सोशल लाइव्ह स्ट्रीमिंग अॅप आहे जे केवळ दोन क्लिकमध्येच लाइव्ह निर्मिती करण्याची सुविधा पुरवते. हे अॅप ५ लाखांपेक्षा अधिक वेळा डाऊनलोड्स झाले असून  जानेवारी २०२१ मधील लॉन्चिंगपासून १ लाख अमेरिकन डॉलर एवढा विक्रमी मासिक महसूल नोंदवला. यामुळे ऑनलाइन कंटेंट निर्मात्यांमध्ये तो टॉप पर्यायांपैकी एक ठरतोय असे दिसून येते.

भारतातील ४४८ दशलक्ष सोशल मीडिया यूझर्सच्या कंटेंटचे निरीक्षण करून जगभरात त्यांची पोहोच वाढवणे तसेच त्यांच्या प्रतिभेचे प्रसारण करणे, ही गरज पुरवण्यासाठी जेएल स्ट्रीम गतिशीलतेने मदत पुरवतो. आज जेएल स्ट्रीम हा ऑनलाइन कंटेंट निर्मात्यांमध्ये प्रसिद्ध झाला असून लाइव्ह स्ट्रीमिंग क्षेत्रात तो स्वत:चा ठसा उमटवण्याच्या प्रयत्नात आहे. हे अॅप आता गूगल प्ले स्टोअर आणि आयओएस अॅप स्टोअरमध्ये चीन व्यतिरिक्त जगभरात  डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे.

कंटेंट निर्माते या अॅपमध्ये विविध सृजनशील, संवादपर आणि वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स वापरू शकतात. उदा. KISS- शॉर्ट इंट्रो व्हिडिओ, लाइव्ह व्हिडिओ कॉन्सेप्ट, तसेच चाहते व इतर स्ट्रीमर मित्रांच्या थेट संपर्कात राहण्यासाठी प्रायव्हेट चॅट आणि व्हिडिओ फॅसिलिटी देण्यात आली आहे. कविता कौशिक, पलक मुंचाल, जसबीर जस्सी, दलजीत कौर, पूजा मिश्रा, अली कुली मिर्झा आणि सोफी चौधरी हे सेलिब्रेटिजदेखील त्यांच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याकरिता या मेड इन इंडिया अॅपचा वापर करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here