By निकेत पावसकर
@maharashtracity
सिंधुदुर्ग: नाशिक (Nashik) येथील हौशी कलाकार प्रसाद देशपांडे (Prasad Deshpande) यांची संकल्पना आणि दिग्दर्शित केलेल्या “लक्ष्मी” या लघुपटाला जागतिक स्तरावरील लघुपट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
अमेरिकन सोसायटी ऑफ सेफ्टी प्रोफेशनल या अमेरिकेतील (USA) नामांकित संस्थेच्या जागतिक स्तरावरील भारतात झालेल्या 9व्या भारतीय प्रोफेशनल डेव्हलपमेंट कॉन्फरन्स मधील सुरक्षा आणि आरोग्य यावरील लघुपट स्पर्धेत हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला. महाराष्ट्रातून त्यांचा एकमेव लघुपट या स्पर्धेत होता. विशेष म्हणजे या लघुपटात एकही संवाद नाही. याबद्दल त्यांंचे अभिनंदन होत आहे.
सध्याच्या परिस्थितीत कोरोनाने (corona) आपणांस स्वतःचे आरोग्य सुरक्षित ठेऊन स्वतः सुरक्षित राहणे हे किती महत्वाचे आहे हे दाखवून दिले आहे, त्यामुळे आरोग्य सुरक्षित तर आपण सुरक्षित हे स्पष्ट झाले आहे. पण आरोग्य हे नेहमीच चांगले सुरक्षित ठेवण्यासाठी आपण आपल्या घरात, परिसरात स्वच्छता ठेवणे हेही तितकेच महत्वाचे आहे. कारण अस्वच्छतेमुळे अनेक रोग पसरतात आणि आपण आजारी पडून रुग्णालयात दाखल होतो, असे होऊ नये म्हणून नाशिकच्या हौशी कलाकाराने आरोग्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून “लक्ष्मी” नावाचा एक लघुपट तयार केला आहे. ज्यातून स्वच्छतेचे महत्त्व दाखविले आहे.
प्रसाद देशपांडे हे व्यवसायाने सुरक्षा पर्यावरण आणि आरोग्य अधिकारी म्हणून एक खाजगी कंपनीत कार्यरत आहे, फिल्म क्षेत्रातील कोणतेही शिक्षण, अभ्यास, अनुभव नसताना केवळ हौसेपोटी ते लेखनासॊबतच सुरक्षा, पर्यावरण आणि आरोग्य तसेच सामाजिक विषयावर लघुपट बनवीत असतात. 2015 साली नाशिकच्या कुंभमेळा साठी त्यांनी प्रथमच गंगा म्हणजे पाणी प्रदूषणावर पहिला “गंगा माँ का दर्द” हा लघुपट तयार केला होता. आणि त्याला महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट लघुपट म्हणून सन्मानित करण्यात आले. याशिवाय त्यांनी अनेक लघुपट बनविले आहेत.
अनेक फिल्म महोत्सवात त्यांच्या लघुपटाला सन्मानित केले आहे, आता त्यांच्या स्वच्छता यावर आरोग्यासाठी जनजागृती करीत असलेल्या “लक्ष्मी” या लघुपटला अमेरिकन सोसायटी ऑफ सेफ्टी प्रोफेशनल या अमेरिकेतील नामांकित संस्थेच्या जागतिक स्तरावरील भारतात झालेल्या 9व्या भारतीय प्रोफेशनल डेव्हलपमेंट कॉन्फरन्स मधील सुरक्षा आणि आरोग्य यावरील लघुपट स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेत
महाराष्ट्र राज्यातून एकमेव लघुपट सहभागी झाला होता. विविध देशातून सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून या लघुपटाची निवड करण्यात आली. याबद्दल त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे. या यशासाठी त्यांचे नाशिकमधून आणि महाराष्ट्रातील सर्व औद्योगिक सुरक्षा अधिकारी यांनी अभिनंदन पर कौतुक केले जाते आहे.