खिलाफत चळवळीच्या माध्यमातूनच धर्मावर आधारित राजकारणाची सुरूवात झाली आणि त्यातूनच पुढे फाळणीची बीजे पेरली गेली, असे विश्लेषण साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने त्यांनी लिहलेल्या `सावरकर – एकोज फ्रॉम दी फरगॉटन पास्ट’ या पुस्तकावर आयोजित चर्चेत ते बोलत होते.

अभ्यासक्रमातही सावरकरांविषयी आकस

सीबीएसईसारख्या अभ्यासक्रमात आकसापोटी त्यांचा इतिहास लिहिला गेला नाही. त्यामुळेच आजच्या युवा पिढीपर्यंत सावरकर पोहचणे गरजेचे आहे. या भावनेतून या पुस्तकाची निर्मिती झाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रात वाजपेयी सरकार आल्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा अधिक तीव्र झाला, संसदेत त्यांचे तैलचित्र लावल्यानंतर तसेच केंद्रीय मंत्री असताना मणिशंकर अय्यर यांनी दाखविलेली असूया असा प्रसंगातून ही भावना अधिकच दृढ होत गेली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आजही चर्चा होताना दिसून येते. यातूनच त्यांचा प्रभाव आणि विचार जिवंत असल्याचे दिसून येते, असेही त्यांनी सांगितले.

क्रांतिचा पाया मुलभूत तत्वावर आधारित

क्रांती घडविण्यासाठी तिचा पाया मुलभूत तत्वांवर आधारित असावा लागतो. त्याबद्दल त्यांचा अभ्यास वयाच्या 14 व्या वर्षांपासूनच होता. अष्टभुजादेवीसमोरची शपथ असो किंवा विदेशी कपड्यांची होळी, या प्रसंगातून त्यांचे विचार जनमानसापुढे त्या काळात प्रभावीपणे आले आणि अनेकांना प्रेरणा मिळाली. 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामाचे विवेचन त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दिलेला हादरा हा क्रांतीच्या तत्वांचा आणि निर्धाराचा परिपाक होता. गांधींनी मोपला, बंगाल, दिल्ली, स्वामी श्रद्धानंदाच्या खून्याला बंधूत्वाचे नाते सांगितल्यानंतर त्यांना प्रतिकार होणे गरजेचे होते. म्हणूनच हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करणारे हिंदुत्व हे इंग्रजीतील पुस्तक लिहून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विचार त्यांनी नेला.

माफी नाही तर देशकार्य संधीची याचिका

त्यांच्या माफीनाफ्याचा नेहमीच गल्लत केली गेली आहे. हा माफीनामा नसून केवळ याचना आहे आणि ती तत्कालिक परिस्थितीती क्रांतिकार्य करण्यासाठी मिळालेली एक संधी होती. ते स्वतः बॅरिस्टर होते शिवाय राजबंद्यांची नियमावली त्यांना ठावूक होती. त्यामुळे जाणीवपूर्वक चुकीचे कृत्य न करता त्यांनी देशकार्याच्या संधीसाठी केलेली युक्ती होती, हे ध्यानात घेतले नाही तर आपण फार मोठा चुक करून घेत आहोत, हे राहुल गांधींसारख्यांनी समजले पाहिजे. स्वतः त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना ओळखले होते व त्यांच्या कार्याचा सन्मान केला होता, हे त्यांनी विचारात घेतले पाहिजे, या मुद्यांवर देखील विक्रम संपत यांनी भर दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here