@maharashtracity

धुळे: शहरातील विविध विकास कामांसाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (UD Minister Eknath Shinde) यांनी ७ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती शहराचे आमदार फारुख शाह यांनी दिली.

धुळे (Dhule) शहरात विविध विकासकामे व्हावी, वस्त्यांचा विकास होऊन तेथील नागरिकांना सुख-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार ७ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

धुळे ही ड वर्गाची महापालिका असून, तिची आर्थिक फार नाजूक आहे. महापालिकेचे उत्पन्न पुरेशे नसल्यामुळे महापालिका हद्दीतील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवता येणे शक्य होत नाही. धुळे शहरातील अनेक भागांमध्ये आजही मूलभूत सोयी-सुविधा नसून, त्यात प्रामुख्याने रस्ता व गटारींची कामे झाली नसल्याने नागरिक सोयी-सुविधांपासून वंचित आहेत.

धुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता आज मनपाकडे वरील कामे करण्यासाठी निधी उपलब्ध नाही. याच कारणास्तव शहरातील नागरिकांमध्ये विकास कामे होत नसल्याने प्रचंड नाराजी असून, धुळे महापालिका हद्दीतील खालील विविध प्रभागांमध्ये रस्ता व गटारींची कामे करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

वरील विषयांना घेऊन आमदार फारुख शाह यांनी राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत वरील समस्यांचा पाढा वाचला होता. मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी विविध कामांना निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केली होती. शहरातील विविध प्रभागांत विकासासाठी आवश्यक असलेला किमान ७ कोटी ७५ लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here