फोर्टीस कॅन्सर इन्स्टिट्युटचे सर्वेक्षण समोर

Twitter: @maharashtracity

मुंबई: कर्करोग हा गंभीर आजार असून या आजाराबाबतचे लोकांचे वर्तन समजून घेण्यासाठी फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ फोर्टिस हॉस्पिटल्सकडून सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात कर्करोगाच्या विविध प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक बाजूंवर उत्तरे मिळवली. यातील लवकर निदान, तपासणी, आजाराबाबत माहिती, साथीच्या काळात कर्करोगाच्या रूग्णांना भेडसावणारी आव्हाने, विम्याची गरज आणि सर्वोत्तम कॅन्सर केअर अशा प्रश्नांवर ४,३५० मुंबईकरांशी संवाद साधला. यावेळी ८१ टक्के लोकांनी निदानाची भीती ही वेळेत तपासणी आणि वेळेवर उपचारांशी संबंधित मोठी समस्या असल्याचे सांगितले. दरम्यान ८१ टक्के जण निदानाला घाबरत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले.

कर्करोगाचे निदान होण्याची भिती मनात कायम असूनही ८३ टक्के प्रतिसादकर्त्यांनी दीर्घकाळ तंबाखू सेवन, अनारोग्यदायी आहार आणि कौटुंबिक इतिहासामुळे कर्करोगाचा धोका वाढत असल्याची जाणीव असल्याचे कबुल केले. तर ३ टक्के जणांनी कर्करोगासाठी कौटुंबिक इतिहास कारणीभूत असल्याचे सांगितले. ७८ टक्के जणांनी सर्व कर्करोग लवकर आढळल्यास उपचार करण्यायोग्य असल्याचे सांगितले.

९ टक्के प्रतिसादकर्त्यांनी कर्करोगाचे निदान लवकर झाले तरी त्यावर उपचार करता येत नसल्याचे सांगितले. ४९ टक्के जणांच्या मते कर्करोग म्हणजे मृत्यू तर ५१ टक्के जणांच्या मते वेळेवर निदान उपयुक्त ठरु शकते. तसेच ७२ टक्के जणांच्या मते कौटुंबिक इतिहासाकडे दुर्लक्ष करून पुरुष आणि महिलांनी कर्करोग तपासणीला समान महत्त्व दिले.

९० टक्के प्रतिसादकर्त्यांना लवकर तपासणी आणि आत्मपरीक्षा कर्करोग लवकर ओळखण्यात मदत करू शकते याची जाणीव होती. मात्र ८० टक्के लोकांच्या मते ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकासाठी कर्करोग तपासणी करणे आवश्यक आहे. तर १६ टक्के जणांच्या मते जर तुमचा कौटुंबिक कर्करोगाचा इतिहास असेल तरच वेळेवर तपासणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावर बोलताना कर्करोग विषयातील ज्येष्ठ सल्लागार डॉ. बोमन धाभर म्हणाले की, काळजी घेणे ही या सर्वेक्षणातील महत्त्वाची बाब असून रुग्णांना तसेच रुग्णांची काळजी घेणाऱ्या भेडसावणाऱ्या आव्हानांचा विचार करण्यात आला आहे. यात २८ टक्के प्रतिसादकांनी जनजागृती निर्माण करण्याची गरज व्यक्त केली.

२६ टक्के प्रतिसादकांनी परवडणाऱ्या उपचारांची गरज व्यक्त केली. १५ टक्के प्रतिसादकांनी सर्व भौगोलिक क्षेत्रांमध्घ्ये कॅन्सर केअर सक्षम करण्याची गरज व्यक्त केली. या निष्पत्ती कॅन्सर केअरची जागतिक थीम ‘क्लोजिंग द केअर’ गॅपला अधोरेखित करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here