@maharashtracity

सात तलावांत साडेतीन महिन्यांचा पाणीसाठा
ऑक्टोबर अखेरपर्यन्त पुरेल इतका पाणीसाठा

मुंबई: मुंबईत शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे (heavy raining) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत १ लाख २८ हजार ९३ दशलक्ष लिटर पाण्याची वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत सात तलावांत एकूण ४ लाख १५ हजार १७५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा (Water storage) जमा झालेला आहे.

मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. त्यानुसार सध्याचा पाणीसाठा पाहता मुंबईला पुढील १०७ दिवस म्हणजे ३१ ऑक्टोबरपर्यंत पुरेल इतका आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत (Mumbai) पावसाचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे तलावातील (dams) पाणीसाठा कमी झाला होता. परिणामी पालिका व मुंबईकरांना पाण्याबाबत चिंता लागून राहिली होती. गेल्या दोन दिवसात जोरदार पाऊस पडून पाणीसाठ्यात वाढ झाली नसती तर मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवणार होते. मात्र आता तलावात बऱ्यापैकी पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे पाणी कपातीचे संकट तूर्तास पुढे ढकळले गेले आहे.

गेल्या २४ तासात सात तलावांत १ लाख २८ हजार ९३ दशलक्ष लिटर इतक्या पाणी साठ्याची वाढ झाली आहे.

तलावातील पाणीसाठा, पावसाची नोंद

तलाव पाणीसाठा २४ तासातील
दशलक्ष लि. पाऊस, मिमी

अप्पर माहिती उपलब्ध १५५.०० वैतरणा नाही

मोडकसागर ६६,०९२ २६९.००

तानसा ७८,४६७ २९३.००

मध्य वैतरणा ३७,५५१ ३०६.००

भातसा १,९७,३२१ २०१.००

विहार २७,६९८ ६९.००

तुळशी ८,०४६ १४२.००

एकूण
पाणीसाठा -: ४,१५,१७५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here