@maharashtracity

धुळे: प्रशासकीय दिरंगाईमुळे नुकसान भरपाई मिळत नसल्याने शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील आरावे येथील मेंंढपाळ शेतकरी शहादू निवृत्ती तांबे यांनी स्वातंत्र्य दिनी (Independence Day) रविवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न (attempt to suicide) केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत संबंधित शेतकर्‍याला ताब्यात घेतले.

आरावे येथील शेतकरी (farmer) शहादू तांबे हे शेतीसह मेंढपाळाचा व्यवसाय करतात. शेवाळे (ता.शिंदखेडा) शिवारात त्यांची शेतजमीन आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १२ या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी कुठलीही परवानगी न घेता शासनाच्या संबंधित ठेकेदाराने त्यांच्या शेतातील लाखो ब्रास माती खोदून शेती उद्ध्वस्त केली, असा तांबे यांचा आरोप आहे.

संबंधित ठेकेदाराविरूद्ध गुन्हा दाखल करावा तसेच आपणास नुकसान भरपाई (compensation) मिळावी, अशी मागणी तांबेंनी केली आहे. शिवाय, मेंढपाळ शेतकरी शहादू तांबे यांनी भरपाईसाठी प्रशासनाकडे वेळोवेळी दाद मागितली. राज्याच्या गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यावर दखल घेण्यात येवून गृहमंत्र्यांनी (Home Minister) योग्य ती कार्यवाहीचे आदेश प्रशासनाला दिले होते.

परंतु, त्यानंतरही न्याय न मिळाल्याने तांबे यांनी कंटाळून स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी शेतकरी तांबेला वेळीच ताब्यात घेतले. यामुळे पुढील अनर्थ टळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here