@maharashtracity

औरंगाबाद: भाजपचे (BJP) ओबीसी मोर्चाचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष प्रा. गोविंद केंद्रे यांना शिवसेना मंत्र्यांच्या कार्यालयात नेऊन जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.

प्रा. गोंविद केंद्रे डोक्याला जबर मारहाण झाल्याने त्यांच्यावर सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

औरंगाबाद (Aurangabad) गारखेड़ा येथील लसीकरण केंद्रावर प्रा गोविंद केंद्रे (Prof Govind Kendre) आणि शिवसेना (Shiv Sena) नेते राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी गोविंद केंद्रे यांना गाडीत घालून शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे (Minister Sandipan Bhumre) यांच्या कार्यालयात नेले. 

त्या ठिकाणी शिवसैनिकांना बोलावून भूमरे यांच्या कार्यालयात मारहाण करण्यात आली. प्रा गोविंद केंद्रे यांच्यावर सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here