@maharashtracity

धुळे: भरधाव ट्रकने धडक देत मोटरसायकलस्वार तरुणाला तब्बल दिडशे मिटरपर्यंत फरपटत नेल्याने चाकाखाली चिरडून तरुण जागीच ठार झाला. ही भीषण घटना (accident) आज सकाळी सोसायटी पेट्रोलपंपाजवळ घडली. गोपाल बबन वाडेकर असे मयत तरुणाचे नाव असून तो मोहाडी येथील रहिवाशी होता.

शहरातील सोसायटी पेट्रोलपंपाच्या पुढे आज सकाळी १० वाजेच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक एम एच १८- बी पी. ४००२ यावरुन मोहाडी उपनगरात राहणारा गोपाल बबन वाडेकर (वय ३५) हा तरुण जात असतांना मागून भरधाव आलेल्या ट्रक क्र. एम.एच. १८- बी.डी. २८४२ वरील चालकाने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करीत बेदरकारपणे वाहन चालवत गोपाल वाडेकर याला धडक दिली.

त्यामुळे गोपालची मोटरसायकल पडून मागच्या चाकाखाली अडकली. ट्रक चालकाने यावेळी ट्रक न थांबवता थेट पळ काढण्याचा प्रयत्न केला, मागच्या चाकात अडकलेला गोपालसुध्दा फरफटत गेला. ट्रक चालकाने गोपालला सुमारे दीडशे मीटर अंतरापर्यंत खेचत नेले.

महामार्गावरील हॉटेल यश प्रेसिडेंटपर्यंत ओढत नेल्यानंतर ट्रक चालकाला लोकांंनी अडवून पकडले. मागील चाकात अडकेला गोपाल जागीच ठार झाला होता. दरम्यान, याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी सदर ट्रक चाळीसगाव पोलीस ठाण्यामध्ये जमा करण्यात आले आहे आणि त्या ट्रक चालकाला सुध्दा अटक करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here