Ashish Shelar

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार

Twitter : @maharashtracity

मुंबई: राज्यातील गरिब, कष्टकरी, कामगार, श्रमिक यांच्या घामाला, श्रमाला, दैवतांना आणि त्याच्या भाकरीला मोल देणारा अर्थसंकल्प राज्याचे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. त्याबद्दल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

राज्यातील जनतेला जो जे वांच्छिल ते ते देणारा हा अर्थसंकल्प असून विकासाची यात्रा, गावातील जत्रा आणि वारकऱ्यांची दिंडी या सगळयांसोबत चालणारा हा अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जो नारा दिला आहे त्यानुसारच ’सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास’’ या दिशेने भविष्यात महाराष्ट्राला उभे करणारा आजचा अर्थसंकल्प आहे. गेल्या अडीच वर्षांचा अंधःकार, नैराश्य, सततचे रडगाणे हे सारे दूर करुन आधुनिक महाराष्ट्राला प्रकाशाकडे नेणारा आशावादाचे नवनवीन संकल्प असलेला हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here