राज्य रक्त संक्रमण परिषदेची रक्तपेढ्यांना सुचना

Twitter: @maharashtracity

मुंबई: रक्तपेढ्यांनी सरकारी रुग्णालयांना प्राधान्याने रक्तपुरवठा करावा. त्याचवेळी रक्ताच्या गरजेपेक्षा अधिक पुरवठा केल्यास अतिरिक्त गरज भागू शकते. रक्त मिळवणाऱ्या रक्तपेढीने रक्त निकषाच्या तापमानात आहे का त्याचवेळी रक्तातील घटक वापरण्यायोग्य स्थितीत असल्याचे तपासून तसे प्रमाणित करावेत, अशा सुचना राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या नव्या परिपत्रकातून करण्यात आल्या आहेत.

राज्य रक्त संक्रमण परिपत्रकानुसार सरकारी रुग्णालयातील रक्त गरज परवानाधारक रक्तपेढीने समजून घ्यावी. त्याचवेळी रक्तगरजेची चौकशी करावी आणि सरकारी रुग्णालयांना प्राधान्याने मोफत रक्त पुरवठा करावा, असे सुचविले आहे. अतिरिक्त रक्त आणि रक्त घटक एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात हस्तांतरित करताना आवश्यक तापमान राखले जात नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे तापमानाबाबतची काळजी घेण्यात यावी.

निकषानुसार तापमान हवे. तसेच इतर राज्यांमध्ये रक्त अतिरिक्त पुरवठा करण्यात येतो. मात्र संक्रमण परिषदेच्या अधिकाऱ्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतर रक्तपेढ्यांनी सरकारी रुग्णालयांना सर्वात आधी प्राधान्य देणे. मात्र इतर राज्यांमध्ये अधिक दराने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त रक्तसाठा हस्तांतरित केला जात असल्याची बाब आता उघड होत आहे. ना हरकत प्रमाण पत्र मिळाल्यावर रक्तपेढ्या राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या परवानगीने रक्त हस्तांतरित करू शकतात. मात्र पुरवठा करण्यात येणाऱ्या रक्त पेढीकडून घेतलेल्या प्रक्रिया शुल्काच्या तपशीलाचा अहवाल कळवावा, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here