@maharashtracity
मुंबई: कांदिवली (प.), हिरानंदानी सोसायटीमध्ये ३० मे रोजी पार पडलेल्या बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपी डॉ.शिवराज पठारीया यांच्या शिवम रुग्णालयाची मान्यता पालिकेने रद्द करीत या रुग्णालयाला ‘सील’ ठोकले आहे.
बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपीच्या रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे चारकोप विधानसभा अध्यक्ष मनीष साळवी यांनी पालिका आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल केली होती. मुंबई महापालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शुक्रवारी हे रुग्णालय ‘सील’ केले.
या संदर्भातील माहिती, पालिका परिमंडळ – ७ चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली आहे. हिरानंदानी सोसायटीमध्ये झालेल्या बोगस लसीकरण प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, पोलिसांनी चौकशी करून या प्रकरणात डॉ.मनीष त्रिपाठी, डॉ. शिवराज पठारिया, नीता पठारिया यांच्यासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे.