By सचिन उन्हाळेकर

Twitter: Sachin2Rav

मुंबई: चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने पुन्हा एकदा सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. पण प्रत्यक्षात कोरोनाची कोणतीही भीती सध्या तरी मुंबईत नाही. त्यामुळे नवं वर्षाचे स्वागत करताना केवळ काळजी घ्या, पण तोंडावर मास्क लावलाच पाहिजे, असे निर्बंध नसल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमरे यांनी maharashtracity शी बोलताना दिली.

मागील दोन वर्षे सर्वत्र लोक कोरोनाने हैरान झाले होते. तोंडावर मास्क आणि गर्दीच्या ठिकाणी मज्जाव, यासोबत दिलेल्या वेळेतच घराबाहेर पडण्याची मुभा अशा निर्बंधात कोरोनामधील जीवन जगणे असह्य झाले होते. आता मागील एक वर्षांपासून कोरोनाचे निर्बंध हटविण्यात आल्याने सर्वत्र नेहमीप्रमाणे दिनक्रम सुरु झालेला आहे.

मात्र, आता पुन्हा एकदा चीन येथे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बंध लागतील का, असा प्रश्न उपस्थित झालेला असतानाच कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता लोकांनी आपले दिनक्रम सुरू ठेवावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आलेले आहे.

दोन वर्षे नवं वर्षाच्या स्वागता दरम्यान कोरोनाचे निर्बंध लावण्यात आले होते. मात्र यंदा नवं वर्षाच्या स्वागतासाठी कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्यात येणार नाहीत. यासंदर्भात आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमरे यांनी सांगितले की, “कोरोनाची कोणतीही भीती लोकांनी बाळगू नये. त्यामुळे नवं वर्षाच्या स्वागता दरम्यान लोकांनी मास लावावा, असे कोणतेही निर्बंध नसणार नाहीत.”

डॉ गोमरे पुढे म्हणाल्या की, “एकत्र येत नवं वर्षाचे स्वागत करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे मज्जाव असणार नाही. लोकांनी मास्क लावलाच पाहिजे, असेही निर्बंध नसणार आहे. पण ज्यांना दमा, मधुमेह किंवा रक्तदाब आहे त्यांनी स्वतः ची काळजी घेत गर्दीच्या ठिकाणी मास लावावा.”

त्यामुळे यंदा कोरोनाची भीती न बाळगता नवं वर्षाचे स्वागत लोकांना करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here