८४ विद्यार्थी व ४ शिक्षकांवर अहमदनगरमध्ये रुग्णालयात उपचार

Twitter: @maharashtracity

रत्नागिरी: जेवणातून विषबाधा झालेले आणि शिर्डीत उपचार घेत असलेले दर्यापूर (अमरावती) येथील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासमवेत महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील (Minister Radhakrishna Vikhe-Patil)  यांनी व्हिडियो कॉलच्या माध्यमातून आस्थेने चौकशी केली. रत्नागिरी येथून हा संवाद साधत शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे आणि संबंधितांना मुलांची काळजी घेण्याचे निर्देश दिले. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकरदेखील उपस्थित होते. 

अमरावतीतील (Amravati) आदर्श हायस्कूल, दर्यापूर येथून २३० मुले आणि १५ शिक्षक शिर्डीत आले होते. शेगाव, अहमदनगर येथून ते सर्वजण रात्री देवगडकडे जाणार होते. गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी दुपारी शेगाव, अहमदनगर येथे त्यांनी स्वतः तयार केलेले जेवण जेवल्यानंतर रात्री १० च्या सुमारास त्रास जाणवल्यामूळे (food poison) त्यातील ८४  मुले आणि ४ शिक्षकांना उपचारासाठी साईनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सद्यस्थितीत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. 

शिक्षक महाअधिवेशनानिमित्ताने रत्नागिरी (Ratnagiri) येथे असलेले महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शिर्डी (Shirdi) उपविभागीय अधिकारी आणि साईबाबा संस्थानचे साईनाथ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांच्यासह संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या. तसेच वेळोवेळी याबद्दलची माहिती घेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अवगत केले. 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विखे पाटील आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Minister Deepak Kesarkar) यांच्यासमवेत असताना थेट अहमदनगर येथे संबंधित अधिकारी वर्गाकडून व्हिडियो कॉलच्या माध्यमातून प्रकृतीची माहिती जाणून घेत आस्थेने चौकशी केली. यावेळी उपचाराअंती सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती घेऊन यावेळी मुलांची काळजी घेण्याबाबतचे आदेश त्यांनी संबधितांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here