@maharashtracity
सेव्हन हिल्स हाॅस्पिटलमध्ये थेरपीचे उपचार सुरु
आयसीएमआरकडे उपचार थेरपीची नोंद
राज्य कृती दलाकडून उपचार गाईड लाईन्सचा वापर
मुंबई: कोविड आजारावर नवीन उपचार पद्धतीचे प्रयोग सुरु असून आता कॅसिरीव्हीमॅब आणि इमॅडेव्हीमॅब या दोन औषधांचे मिश्रण म्हणजेच काॅकटेल थेरपी उपयोगी पडत असल्याचे समोर येत आहे. (The cocktail theory proves wonderful on covid treatment)
सेव्हन हिल हाॅस्पिटलमध्ये (Seven Hills Hospital) मे महिन्यापासून या काॅकटेल उपचार थेरपीचा प्रयोग सुरु झाला असून १०७२ रुग्णांवर या थेरपीचे उपपचार करण्यात आले. यात ५६ टक्के पुरुष तर ५४ टक्के महिला रुग्ण असल्याचे सेव्हन हिल्स हाॅस्पिटलचे अधिष्ठाता डाॅ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले.
काॅकटेल थेरपी वापर केल्या नंतर रुग्ण ४८ तासात कोविड लक्षणातून मुक्त होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, आतापर्यंत १०७२ रुग्णांवर उपचार केलेल्या रुग्णांचा अहवाल आयसीएमआरला (ICMR) पाठविण्यात आला आहे. हे काॅकटेल औषध नैसर्गिक अँटीबाॅडीशी (antibodies) साधर्म्य साधणारे असून शरीरात गेल्यावर नैसर्गिकरित्या प्रतिपिंड तयार करते.
या औषधाचा उपचार सुरु केल्यापासून रूग्ण आठ दिवसात ठणठणीत होऊन घरी जातो. त्यामुळे हाॅस्पिटलमधील दाखल राहण्याचा कालावधी घटतो. तसेच सात दिवसात आरटीपीसीआर निगेटिव्ह येत असल्याचे सांगण्यात आले.
यावर बोलताना येथील युनिट इनचार्ज डाॅ. राजस वाळींजकर यांनी सांगितले की, कोणत्याही रुग्णाला व्हेंटीलेटर (Ventilator), स्टिराॅईड (Steroids) अथवा रेमेडिसवीर (Remdesivir) द्यावी लागली नाही. मात्र तिघांना ऑक्सिजनची गरज लागली असून हे तिघेही रूग्ण पन्नाशीवरील असल्याचे सांगण्यात आले. शिवाय त्यांची ऑक्सिजन पातळी अत्यंत कमी होती.
ही थेरपी वापर केलेल्या रुग्णांपैकी कोणाचा मृत्यू झाला नाही की रुग्णाला व्हेंटिलेटर लागला नसल्याचे सांगण्यात आले. ही चांगली उपचार पद्धती आहे. मात्र योग्य वैद्यकीय सल्ल्यानेच वापरणे गरजेचे असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
डाॅक्टरने कोणता रूग्ण या थेरपीसाठी यॊग्य – अयोग्य ते ठरवावे असेही ते म्हणाले. राज्य कोविड टास्क फोर्सकडून (Covid Task Force) ही थेरपी वापरा साठी गाईड लाईन काढल्या आहेत जेणेकरून त्यांचा गैरवापर होणार नाही.