@maharashtracity

मुंबई: शिवडी पूर्व विभागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ (Shiv Sena Corporator Sachin Padwal) यांनी, या विभागात विविध वैद्यकीय सेवा सुविधांनीयुक्त एक कंटेनर स्वरूपातील दवाखाना आजपासून सुरू केला आहे.

मुंबई महापालिका (BMC) दरवर्षी आरोग्य सुविधेसाठी हजारो कोटी रुपये खर्च करते. मात्र शिवडी (पूर्व) विभाग हा गेल्या ४० वर्षांपासून महापालिकेच्या अधिकृत दवाखाना, आरोग्य केंद्रापासून वंचित होते. येथील नागरिकांना आरोग्य सुविधेसाठी २ किमी अंतरावरील केईएम (KEM Hospital) व शिवडी नाका येथील आरोग्य केंद्रात पायपीट करावी लागत असे. अगदी कोरोना काळातही या विभागात नागरिकांचे खूप हाल झाले.

दरम्यान, या कंटेनर दवाखान्याचे लोकार्पण बुधवारी महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्या हस्ते आणि खासदार अरविंद सावंत (Shiv Sena MP Arvind Sawant) यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यामुळे या विभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिवडी ( पूर्व) परिसरात गेल्या ४० वर्षांपासून पालिकेचा अधिकृत दवाखाना नव्हता. या विभागात बी.एम.एस. डाॅक्टरसुद्धा उपलब्ध नव्हता. नगरसेवक सचिन पडवळ यांनी या दवाखान्याला ‘बाळासाहेब ठाकरे दवाखाना’ असे नाव दिले आहे.

दवाखान्यात असलेल्या सुविधा

४ AC कंटेनर असलेला दवाखाना
एम.बी.बी.एस. डाॅक्टर, कंपाऊंडर, आरोग्य सेविका व इतर कर्मचारी
मनपा शेड्युलवर असलेली मोफत औषधे
ओ.पी.डी., रक्ततपासणी, मोफत समुपदेशन, लहान मुलांचे लसीकरण (० ते ५ वय)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here