इंधनावरील कर कमी करण्याची मागणी
@maharashtracity
धुळे: भाजपाची (BJP) सत्ता असलेल्या राज्यांमध्ये पेट्रोलचे दर कमी असून तुलनात्मकदृष्टया महाराष्ट्रातील इंधनाचे दर जास्तीचे आहे. यामुळे गुरुवारी इंधन दरवाढीच्या विरोधात भाजपाच्यावतीने शहरातील श्रीराम पेट्रोल पंपसमोर महाविकास आघाडी सरकारच्या (MVA government) प्रतिकात्मक प्रतिमेवर चाबकाचे फटकारे मारून आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने इंधनावरील कर (taxes on petrol – diesel) कमी करावे, अशी मागणी भाजपने केली आहे.
भाजपने दिलेल्या निवेदनानुसार, देशात भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये पेट्रोलचे दर कमी करण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्रात पेट्रोलची प्रचंड दरवाढ कायम आहे. भाजपा प्रणित राज्यांमध्ये गोवा 97 रूपये, मध्य प्रदेश 105 रूपये, उत्तर प्रदेश 105 रूपये तर उत्तराखंड येथेही 105 रूपये लीटर पेट्रोलचे भाव आहे. महाराष्ट्रात आघाडी सरकार असल्याने पेट्रोलचे दर 120 रूपये आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारने इंधन दरावरील कर कमी न करता जनतेची लूट सुरू ठेवली आहे. जर राज्य सरकारने इंधनावरील कर कमी केले असते तर राज्यातील जनतेलाही थोडा दिलासा मिळाला असता. परंतू, राज्य सरकारने तसे केले नाही. यामुळे राज्यात इंधनाचे दर जास्तीचे आहे. परिणामी, इंधन दरवाढीच्या निषेधार्थ भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.
या आंदोलनात भाजपाचे ज्येष्ठ नेते नगरसेवक हिरामण गवळी, नगरसेवक संतोष खताळ, बबन चौधरी, दिनेश बागुल, अमोल धामणे, विनोद खेमनार, सुरेश अहिरराव, प्रमोद चौधरी, हिरालाल मोरे, प्रकाश गवळे, किरण चौधरी, मयुर सुर्यवंशी, मनोज पिसे आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.