मी काय पाकिस्तानचे रस्ते करतोय का?

आ. फारुक शाहंचा सवाल

@maharashtracity

धुळे: एमआयएमच्या महिला आघाडीकडून सोमवारी भाजपा आणि माजी संरक्षण राज्यमंंत्री तथा खा. डॉ. सुभाष भामरेंच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालत जोडेमारो आंदोलन करण्यात आले. मी विकास कामे करताना पाकिस्तानातील रस्ते सुधारत आहे काय, असा सवाल एमआयएमचे आमदार फारुक शाह यांनी उपस्थित करुन भाजपाचे खा. डॉ. सुभाष भामरेंना (BJP MP Dr Subhash Bhamre) खोचक टोला लगावला.

या आंदोलनात एमआयएमच्या (MIM) महिला अध्यक्षा डॉ. दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी, अकिला पिंजारी, रेहाना पिंजारी, जिल्हाध्यक्ष नासीर पठाण, शहराध्यक्ष मुक्तार अन्सारी, रफीक पठाण, निजामदादा सय्यद, आसिफ मुल्ला, साजिद साई, सउद सरदार, शोएब मुल्ला, हलीम अन्सारी, वसिम पिंजारी, अकीब सय्यद, फैसल अन्सारी, हसीम अन्सारी यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

एमआयएमचे आ. फारुक शाह (MIM MLA Faruk Shah) यांनी नगरोत्थान योजनेंतर्गत शहरात 44 कामांचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार 30 कोटींची विकास कामे केली जाणार होती. परंतु, राज्य सरकारने या कामांना स्थगिती दिली. भाजपचे खा. डॉ. सुभाष भामरे, महापौर, मनपा आयुक्तांनी मंत्रालयात जाऊन मंत्र्यांचे पाय धरुन या कामांना स्थगिती दिली, असा आरोप आ. शाह यांनी केला आहे. यामुळे एमआयएमच्या महिला आघाडीने भाजपा (BJP) आणि खा. डॉ. भामरेंच्या विरोधात सोमवारी शहरातील 80 फुटी रोडवर तीव्र आंदोलन केले. यावेळी खा. डॉ. भामरेंच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

“देवपूरसह शहरातील विकास कामांसाठी नगरोत्थान योजनेंतर्गत मुख्यमंत्र्यांकडून मी 30 कोटी रुपये मंजूर करुन आणले. गेल्या तीन वर्षात शहराच्या विकासासाठी मी 400 कोटी रुपये आणले. परंतु, केवळ मुस्लिम भागातच कामे होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. हा निधी केवळ शहराच्या विकासासाठीच वापरला जाणार होता. परंतु, खा.डॉ.भामरेंनी हा निधी मिळू नये, यासाठी मंत्रालयात चकरा मारल्या आणि निधी रोखला. हा निधी रोखल्याने शहरातील विकास कामे ठप्प होतील.”

  • आ. फारुक शाह, एमआयएम, धुळे शहर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here