@maharashtracity
धुळे: साक्री तालुक्यातील निजामपूर गावातील रामीकर खतांचे दुकान फोडून चोरट्यांनी दोन लॅपटॉप, सी.सी.टी.व्हीचा डीव्हीआर तसेच मोबाईलचे चार्जर, असा 42 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. या प्रकरणी निजामपूर पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
विलास राजेंद्र सोनवणे रा.निजामपूर ता.साक्री यांच्या मालकीचे नंदुरबार – साक्रीरोड लगत निजामपुर गावात रामीकर नावाने खतांचे दुकान (fertilizer shop) आहे. दि. 22 ते 23 मे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी खतांचे दुकान फोडून दोन लॅपटॉप, सी.सी.टी. व्हीचेे डीव्हीआर व दोन हजार रुपये रोख असा एकूण 42 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल चोरुन नेला (robbery). या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.