@maharashtracity

धुळे: धुळे एज्युकेशन सोसायटीचे (Dhule Education Society) उपाध्यक्ष डॉ. महेश घुगरी यांची जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे (North Maharashtra University) अधिसभा (सिनेट) सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियमातील तरतूदीनुसार डॉ. महेश कृष्णराव घुगरी (Dr Mahesh Ghugari) यांची अधिसभा सदस्य म्हणून निवड करण्यात येत असल्याची अधिसूचना दि. २८ ऑगस्ट, २०२२ रोजी जारी केली आहे.

विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल डॉ. महेश घुगरी यांचे धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र बेलपाठक, मानद सचिव संतोष अग्रवाल, खजिनदार डॉ.मंदार म्हस्कर, संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य युवराज करनकाळ तसेच डॉ. पी. के. ओढेकर, डॉ. अरविंद महाजनी, डॉ. प्रविण बाफना, डॉ. मकरंद पटवर्धन, मुकुंदराव ओगले, विनोद पालेशा, प्रदीप धाराशिवकर, प्राचार्य डॉ. पी. पी. छाजेड, प्राचार्य डॉ. शोभा चौधरी आणि अन्य पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

शैक्षणिक, सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रातील विविध संस्थांशी निगडित असलेले तसेच भारत सरकारच्या केंद्रीय दक्षता व संनियंत्रण समितीचे धुळे जिल्हा सदस्य डॉ. महेश घुगरी हे इंडियन रेडक्रॉस (Indian Redcross Society) संस्थेच्या धुळे जिल्हा शाखेचे अध्यक्ष आहेत. याशिवाय धुळे जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष आणि रिमांड होम संस्थेशी देखील ते संबंधित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here