उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा!
By अनंत नलावडे
Twitter: @NalavadeAnant
नागपूर: मुंबई ही महाराष्ट्राचीच असून मुंबईवर दावा सांगणे खपवून घेतले जाणार नाही, असा सणसणीत इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना कर्नाटक सरकाराला दिला.
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलताना फडणवीस पुढे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री व कर्नाटक सरकारला निषेधाचे पत्र पाठविण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत नव्याने दावे केले जाणार नाहीत असे ठरले होते. आता मुंबईसंदर्भात कर्नाटक सरकारने केले ते दावे बैठकीतील ठरावाच्या विसंगत प्रकारचे दावे आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सभागृह याचा निषेध करित आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री यांना पत्राद्वारे कळविले जाईल. केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर जे ठरले आहे त्याचे उल्लंघन करणे हे खपवून घेणार नाही, असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.