@maharashtracity

मुंबई: मुंबईत २०४० जणांना बनावट लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती मुंबई पालिकेने राज्य सरकारला कळवली आहे. यातील ज्यांना बनावट लसीकरण (fake vaccination) झाले आहे अशांचे लसीकरण करण्यात येईल. मात्र, हा लसीकरण निर्णय पूर्णतः केंद्राच्या अखत्यारीत असून केंद्राला कळविण्यात येणार आहे. त्यानुसार पुनः लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली.

ज्यांचे बनावट लसीकरण झाले आहे, अशांची आरोग्य तपासणी होणार आहे. त्या नागरिकांना आरोग्याची तक्रार असल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या संपर्क क्रमांकावर त्यांनी संवाद साधायचा आहे. तसेच लसीकरण करण्याचा निर्णय पूर्णतः केंद्राचा आहे. मात्र या नागरिकांची प्रतिपिंड चाचणी होणार असून त्याचा अहवाल केंद्राला पुरवला जाणार आहे. त्यावर केंद्र लसीकरण करण्याचा निर्णय घेईल, असे सुरेश काकाणी म्हणाले.

दुसऱ्या बाजूला या बनावट लसीकरणाचा पोलीस तपास सुरु आहे. त्या तपास अहवालाची प्रतीक्षा आहे. तपासात ते बनावट लसीकरण असल्याचे निष्पन्न झाल्यास केंद्राला सांगून ते लसीकरण प्रमाणपत्र रद्द करण्याची विनंती करावी लागणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. शिवाय बनावट लसीकरण झालेल्या नागरिकांना शोधून त्यांची नावे केंद्र सरकारला कळविण्यात येतील, असे काकाणी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here