@maharashtracity

मुंबई: मुंबईत देश- विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना (tourists) मुंबईतील हेरिटेज वस्तूंची माहिती देण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने ३ नोव्हेंबरपासून ‘ओपन डेक बस’ ची मुंबई सफर सुरू केली आहे. (Open Deck tourist BEST bus resumed its service)

बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता बेस्ट उपक्रमाच्या वारसा पर्यटन सेवेचा लोकार्पण सोहळा बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबुरकर यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडिया (Gate Way of India) येथे संपन्न झाला.

मुंबईत कोरोनावर नियंत्रण आल्याने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (tourism minister Aaditya Thackeray) यांच्या संकल्पनेतून पर्यटकांसाठी बेस्टची ‘ओपन डेक बस’ सेवा सुरू करण्यात आली आहे.

ही ओपन डेक बस पर्यटकांना, गेट वे ऑफ इंडिया येथून सुरु होणार असून प्रिन्स वेल्स ऑफ म्युझियम, मंत्रालय, विधानभवन, एनसीपीए, मरिन ड्राईव्ह, चौपाटी, चर्चगेट स्टेशन, ओव्हल मैदान, राजाबाई टाॅवर (मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, हानिॅमन सर्कल, रिझर्व बँक ऑफ इंडिया, ऐशायाटिक लायब्ररी व ओल्ड कस्टम हाऊस अशी सफर घडवणार आहे.

Also Read: हरित फटाक्यांमध्ये विषारी घटक

या पर्यटन बस सेवेअंतर्गत अपर डेक सीटसाठी प्रती व्यक्ती १५० रुपये तर लोअर डेक प्रती व्यक्ती ७५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

बस गाड्यांच्या वेळा -: गेट वे ऑफ इंडिया येथून – सायंकाळी ६.३०, ७. ४५ आणि ८ आणि ९. १५ वाजता.

या पर्यटन बसचे तिकीट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक व गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here