@maharashtracity
महाड: लाकडाची बेकायदेशीर तोड (illegal tree cutting) करुन अनधिकृत वाहतूक करणारी गाडी वन विभागाने (forest department) ताब्यात घेतली असून याप्रकरणी वन विभागाच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक करणारा ट्रक आणि लाकडे वन विभागाने जप्त केली आहेत.
महाड वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आकेशिया जातीची वृक्षाची विनापरवाना तोड करून अनधिकृतपणे वाहतूक करणारा ट्रक क्रमांक के. ए. ५६ – ०६२२ वन विभागाच्या पथकाने पोलादपूर नाका येथे पकडला. दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी रात्री ११ वाजता हा ट्रक वन विभागाने ताब्यात घेतला. यामध्ये आकेशिया ५४ नग, १३.५८२ घनमीटर असा एकूण ५०४९० रुपये किमंतीचा माल आढळून आला. हा वाहतूक करणारा ट्रक वन विभागाने ताब्यात घेतला आहे.
याप्रकरणी मोहम्मद झाकीउद्दिन मोहम्मद हुसैन रा. त्रिपुरानाथ, हवप्पा उर्फ अविनाश चिंचोळीकर रा. त्रिपुरानाथ, यांच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, (२) (ब) ४२, मुंबई वन अधिनियम १९४२ चे कलम ६६ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.