Twitter: @maharashtracity
पुणे: माजी आमदार देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात खासगी रुग्णालयात शुकवारी सकाळी निधन झाले. पुण्यातील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Former President Pratibhatai Patil) यांचे ते पती होते.
शुक्रवारी सकाळी देवीसिंह शेखावत (Devisingh Shekhawat)यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ते अमरावतीचे पहिले महापौर (First Mayor of Amravati Municipal Corporation) होते.
दोन दिवसांपूर्वी देवीसिंह शेखावत यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्याच्या केईएम रुग्णालयात (KEM Hospital, Pune) दाखल करण्यात आले होते. आज सकाळी 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. देवीसिंह शेखावत आणि प्रतिभा पाटील यांचा विवाह 7 जुलै 1965 रोजी झाला होता.
देवीसिंह शेखावत शिक्षण क्षेत्रात सक्रिय होते. 1972 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून (Mumbai University) पीएचडी केली. विद्या भारती शिक्षण संस्था फाऊंडेशन संचालित महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. देवीसिंह शेखावत 1985 मध्ये अमरावतीमधून आमदार म्हणून निवडून आले होते.