दुर्घटना टाळण्यासाठी ‘फ्लड रेस्क्यू टीम’

९४ लाईफ गार्डही तैनात

@maharashtracity

मुंबई: यंदाच्या पावसाळ्यात, १३ जून ते १३ सप्टेंबर या कालावधीत २२ दिवस समुद्रात मोठी भरती आहे. जून, जुलै महिन्यात प्रत्येकी ६ दिवस, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी ५ दिवस धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते.

किमान ४.५१ मिटर ते ४.८७ मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. नेमके त्याचवेळी अतिवृष्टी झाल्यास मुंबईत पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने हे २२ दिवस मुंबईसाठी धोकादायक ठरू शकतात.

मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात समुद्रात २२ दिवस मोठी भरती (high tide) आहे. त्याचवेळी अतिवृष्टी (heavy rain) झाल्यास सखल भागात मोठया प्रमाणात पाणी साचते. समुद्र खवळलेला असतो. अशा परिस्थितीत समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यास पर्यटकांसोबत एखादी अप्रिय घटना घडू शकते. यास्तव, यंदाच्या पावसाळ्यात समुद्र चौपाटीवर पालिकेकडून ९४ लाईफ गार्ड (life guard) तैनात करण्यात येणार असून त्यांच्या मदतीला अग्निशमन दलाकडून ‘फ्लड रेस्क्यू टीम’ही (Flood rescue team) तैनात करण्यात येणार आहे.

ही टीम समुद्र चौपट्यांवर तैनात लाईफ गार्ड यांच्या मदतीला धावून जाणार आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असेल तर त्याला वाचविणे सहज शक्य होणार आहे, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी हेमंत परब यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here