प्रत्येकी दहा लाख रुपयांचा मदतीचा धनादेश परिवाराकडे सुपूर्द

By संतोष मासोळे

@SantoshMasole

धुळे: करोना महामारीत (corona pandemic) रुग्णसेवा बजावताना स्वतःचा जीव गमविणार्‍या शहरातील दोन डॉक्टरांच्या कुटुंबियांना भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) संघटनेतर्फे बुधवारी प्रत्येकी दहा लाखांचा मदत निधी देण्यात आला आहे. आय एम ए चे जागतिक खजिनदार डॉ.रवी वानखेडकर (Dr Ravi Wankhedkar) यांच्या हस्ते हा मदत निधी प्रदान करण्यात आला.

रुग्णसेवा करताना भारतातील 1 हजार 500 व महाराष्ट्रातील 55 डॉक्टरांना स्वतःचा जीव गमवावा लागला. त्यात आपल्या धुळे (Dhule) जिल्हयातील 4 ते 5 डॉक्टरांचा त्यात समावेश आहे. दुर्दैवाने भारत (India) व महाराष्ट्र (Maharashtra) सरकार मृत डॉक्टरांच्या कुंटुंबीयांना कुठलीही मदत करीत नसल्याने अखेर भारतीय वैद्यकीय संघटना अर्थात आय.एम.ए.मार्फत ’कोविड मार्टीरज फंड’ची देश पातळीवर निर्मिती केली आहे. या निधीतून अनेक डॉक्टर कुटुंबियांना मदतीचा हात दिला.

फोटो सहयोग विजय चौधरी


धुळे शहराचे सेवाभावी डॉक्टर चुडामण पाटील Dr Chudaman Patil) आणि डॉ.शिवराज निकुंभ (Dr Shivraj Nikumbh) यांचे करोनामुळे निधन झाले. अशा संकट समयी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार म्हणून इंडियन मेडीकल असोसिएशनने प्रत्येक कुटूंबाला 10 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश दिला आहे. हा मदत निधी जागतिक आरोग्य संघटनेचे खजिनदार डॉ.रवी वानखेडकर, आयएमए संघटनेचे राष्ट्रीय सचिव डॉ.जयेश लेले, धुळे जिल्ह्याचे आयएमए अध्यक्ष डॉ.राधेशाम रोडा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कुटूंबियांतर्फे डॉ.उषा पाटील, श्रीमती उषा निकुंभ, डॉ.अनुषा निकुंभ, डॉ.सौरभ निकुंभ यांनी हा धनादेश स्विकारला. याप्रसंगी आयएमए धुळेचे कार्याध्यक्ष डॉ.जयंत देवरे, सचिव डॉ.दिपक शेजवळ, माजी अध्यक्ष डॉ.जया दिघे, माजी सचिव डॉ.महेश आहिरराव, खजिनदार डॉ.सचिन ढोले आदी डॉक्टर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here